Home > News Update > सर्वोच्च न्यायालयाचा अजय मिश्राला दणका: जामीन रद्द

सर्वोच्च न्यायालयाचा अजय मिश्राला दणका: जामीन रद्द

सर्वोच्च न्यायालयाचा अजय मिश्राला दणका: जामीन रद्द
X

उत्तर प्रदेशातील लखीमपुर खेरीमध्ये घडलेल्या हिंसाचार प्रकरणी आरोपी असणारे आणि केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांना मंजूर करण्यात आलेला जामीन आज सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला.त्याचप्रमाणे आठवड्याभरात तुरुंगात पुन्हा परतण्याचे देखील आदेश न्यायालयाने दिले आहे.

लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांचे आंदोलन चालू होते.तेथे झालेल्या हिंसाचारात एकूण आठ जणांचा मृत्यू झाला. यात चार शेतकऱ्यांचा समावेश आहे.केंद्रीय मंत्र्यांच्या गाडीने शेतकऱ्यांना चिरडल्याचा आरोप आहे. या हिंसाचाराची घटना समोर आल्यानंतर व्हिडीओ व्हायरल झाला होता.

त्यामध्ये केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा आशिष मिश्रा ही चारचाकी चालवत असल्याचं प्रथमदर्शनी उघडकीस आलं. आता या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्यात मिश्रांना दणका बसला आहे.अलाहाबाद उच्च न्यायालयाने १० फेब्रुवारी रोजी झालेल्या सुनावणीत आशिष मिश्रा यांना जामीन मंजूर केला होता.

त्यामध्ये केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा आशिष मिश्रा ही चारचाकी चालवत असल्याचं प्रथमदर्शनी उघडकीस आलं. आता या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. त्यात मिश्रांना दणका बसला आहे.

Updated : 18 April 2022 12:14 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top