Home > News Update > Pawan Khera Arrested : सुप्रिम कोर्टात ऑडीओ आणि अंतरिम दिलासा..

Pawan Khera Arrested : सुप्रिम कोर्टात ऑडीओ आणि अंतरिम दिलासा..

Pawan Khera Arrested : सुप्रिम कोर्टात ऑडीओ आणि अंतरिम दिलासा..
X

आसाम पोलिसांनी दिल्ली विमानतळावरून अटक केलेल्या काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा यांना सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी अंतरिम दिलासा दिला. सुनावणीच्या पुढील तारखेपर्यंत खेरा यांना दिल्लीतील न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर करून अंतरिम जामिनावर सोडण्यात यावे, असा आदेश न्यायालयाने दिला.

अटकेबाबत वकील अभिषेक मनु सिंघवी सर्वोच्च न्यायालयात पोहोचले. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती एमआर शहा आणि न्यायमूर्ती पीएस नरसिम्हा यांच्या खंडपीठाने दुपारी 3 वाजता सुनावणी सुरू केली आणि सुमारे 35 मिनिटे सुनावणी घेतल्यानंतर पवन खेरा यांना अंतरिम जामीन मंजूर केला. न्यायालयाने आसाम आणि उत्तर प्रदेश सरकारांना नोटिसाही बजावल्या आणि तीन ठिकाणी नोंदवलेले खटले एकाच अधिकारक्षेत्रात आणण्याबाबत प्रश्न उपस्थित केले. आसाम सरकारच्या वतीने एएसजी ऐश्वर्या भाटी यांनी युक्तिवाद केला.

खेरा यांनी दाखल केलेल्या रिट याचिकेवर न्यायालयाने उत्तर प्रदेश आणि आसाम या राज्यांना नोटीसही बजावली आहे, ज्यांनी त्याच्याविरुद्ध एफआयआर नोंदवले आहेत. खेरा यांचे वकील ज्येष्ठ अधिवक्ता अभिषेक मनु सिंघवी यांनी दिलेल्या हमीपत्रात ते बिनशर्त माफी मागतील अशी नोंदही या आदेशात करण्यात आली आहे.

सिंघवी यांनी सरन्यायाधीशांना माहिती दिली की खेरा दिल्ली विमानतळावरून सकाळी ११ वाजता विमानात बसणार होते, पण त्यांना उतरवण्यात आले. पुन्हा तक्रारी दाखल झाल्या आहेत. अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऐश्वर्या भाटी यांनी सादर केले की अटकेची नोंद करण्यात आली आहे आणि त्याला दंडाधिकार्‍यांसमोर हजर करण्याची कार्यवाही सुरू आहे.

यावेळी प्रवीण खेरा यांनी घेतलेल्या पत्रकार परीषदेतील ऑडीओ न्यायालयात ऐकवण्यात आला. त्यावर हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अपमान करणारं वक्तव्य असल्याचं सांगितलं.काँग्रेस नेते पवन खेरा यांना दिल्ली विमानतळावर अटक करण्यात आलं आहे. आसाम पोलिसांच्या विनंतीवरुन दिल्ली पोलिसांनी अटकेची कारवाई केली आहे. आसाम पोलीस पवन खेरा यांना ताब्यात घेण्यासाठी दिल्लीकडे रवाना झाले आहेत. पवन खेरा हे दिल्लीहून रायपूरला काँग्रेसच्या अधिवेशनासाठी निघाले होते. त्यासाठी दिल्लीहून रायपूरला जाणाऱ्या विमानात ते बसले होते. मात्र, त्यांना विमानातून खाली उतरवून अटक करण्यात आली आहे. खेरा यांच्यावरील अटकेच्या कारवाईमुळं काँग्रेसनं विमानतळावर आंदोलन सुरु केलं. रायपूरमध्ये होणाऱ्या काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनात अडथळा आणण्यासाठी ही कारवाई केली गेल्याचा आरोप त्यांनी केला.

पवन खेरा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल एक वक्तव्य केलं होतं. त्यामुळं भाजपनं खेरा यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. पवन खेरा यांनी यासंदर्भात एक ट्विट करुन माहिती दिली आहे. तुमच्याकडे असलेल्या साहित्यामध्ये अडचण असल्याचं सांगत विमानातून उतरवण्यात आलं त्यानंतर डीसीपी बोलणार असल्याचं सांगण्यात, मी बराच वेळ वाट पाहतो, असं ट्विट पवन खेरा यांनी केलं.

पवन खेरा यांनी अदानीच्या मुद्यावर पत्रकार परिषद घेतली होती. त्यामध्ये त्यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली होती. त्यामध्ये त्यांनी "अटलबिहारी वाजपेयींनी संयुक्त संसदीय समिती बनवली होती मग नरेंद्र गौतम दास मोदी यांना काय अडचण आहे", असं म्हटलं होतं. पवन खेरा यांच्या त्या वक्तव्यानंतर भाजप आक्रमक झालं होतं. भाजपनं पवन खेरा यांच्या विरोधात आंदोलन देखील केलं होतं.

खेरा यांच्यावरील कारवाईची 2 कारणे...

1. PM मोदींना नरेंद्र गौतमदास मोदी म्हणाले, नंतर स्पष्टीकरण

पवन खेरा 20 फेब्रुवारी रोजी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. हिंडेनबर्ग अहवालावर ते म्हणाले, "जेव्हा अटलबिहारी वाजपेयी जेपीसी बनवू शकतात, तेव्हा नरेंद्र गौतम दास मोदींना काय अडचण आहे." आपल्या निवेदनात त्यांनी नरेंद्र दामोदरदास मोदींना गौतमदास मोदी असे संबोधले. त्यानंतर त्यांनी आजूबाजूला उभ्या असलेल्या लोकांना हे गौतमदास की दामोदरदास असे विचारले. यानंतर ते म्हणाले की, नाव जरी दामोदरदास असले तरी त्यांचे कार्य गौतमदासांचे आहे. मात्र, नंतर त्यांनी स्पष्ट केले की ते पंतप्रधानांच्या नावाबाबत संभ्रमात होते.

2. लखनऊच्या हजरतगंजमध्ये भाजपने गुन्हा दाखल केला

20 फेब्रुवारी रोजी लखनऊ महानगर भाजपचे अध्यक्ष मुकेश शर्मा यांनी पवन खेरा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. ते म्हणाले की, खेरा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडिलांबद्दल अवमानकारक वक्तव्य केले होते. वाईट हेतूने त्यांनी हे विधान केले आहे. मात्र, दिल्ली पोलिसांनी सांगितले की, आसाम पोलिसांनी पवन खेरा यांना विमानातून उतरवण्याची विनंती केली होती.

Updated : 23 Feb 2023 5:04 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top