फक्त अँबुलन्स चालकच नाही तर इतर दोषींनाही सोडणार नाही, आमदार सुनिल भुसारा यांचा इशारा
मोखाडा तालुक्यातील पायरवाडी येथील आदिवासी पारधी कुटूंबातील सहा वर्षाच्या मुलाच्या मृत्यूनंतर मृतदेह नेण्यासाठी अँबुलन्स नाकारल्याची दुर्दैवी घटना घडली. त्यानंतर आमदार सुनिल भुसारा यांनी पारधी कुटूंबियांची भेट घेत फक्त अँबुलन्स चालकच नाही तर इतर दोषींनाही सोडणार नाही, असा इशारा दिला.
X
मोखाडा तालुक्यातील पायरवाडी येथील आदिवासी पारधी कुटूंबातील सहा वर्षाच्या मुलाच्या मृत्यूनंतर मृतदेह नेण्यासाठी अँबुलन्स नाकारल्याची दुर्दैवी घटना घडली. त्यानंतर आमदार सुनिल भुसारा यांनी पारधी कुटूंबियांची भेट घेत फक्त अँबुलन्स चालकच नाही तर इतर दोषींनाही सोडणार नाही, असा इशारा दिला.
जव्हार कुटीर रुग्णालयात घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर मोखाडा तालुक्यातील पायरवाडी येथील पारधी कुटूंबियांचे सांत्वन करण्यासाठी आमदार सुनिल भुसारा यांनी पारधी कुटूंबाची भेट घेतली. यावेळी भुसारा यांनी फक्त अँबुलन्सच चालकच नाही तर इतर दोषींनाही सोडणार नाही, असा इशारा दिला.
यावेळी मोखाडा तालुक्यातील पायरवाडी येथील पारधी कुटुबियांचे सांत्वन करताना आमदार सुनिल भुसारा यांनी संपूर्ण घटनेची हकीकत समजून घेतली. तसेच या घटनेतील दोषींवर तर कारवाई झाली आहे. मात्र अजूनही यात कोणी दोषी असतील तर त्यांना सोडणार नाही, असा शब्द भुसारा यांनी दिला. तसेच एखादा रुग्ण दगावल्या नंतर नाही, तर त्याच्या उपचारासाठीही मदत मागा. शक्य ती सर्व मदत केली जाईल, असे सुनिल भुसारा यांनी आश्वासन दिले.
यावेळी भुसारा म्हणाले की, घटना दुर्दैवी आहेच. अशा घटना घडु नये, यासाठी सर्व शासकीय यंत्रणानी नियमावली आधी माणुसकी जपायला हवी, असे आवाहन केले.
मोखाडा तालुक्यातील पायरवाडी येथील अजय पारधी या ६ वर्षीय मुलाच्या मृत्यूनंतर मृतदेह घरापर्यंत नेण्यासाठी वाहन उपलब्ध न झाल्याने दुचाकीवरून मृतदेह न्यावा लागला होता. तर या सगळ्याला सरकारी यंत्रणा कारणीभुत ठरल्याने प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली जात होती. त्यामुळे आमदार सुनिल भुसारा यांनी पारधी कुटूंबियांची भेट घेत सांत्वन केले. यावेळी भुसारा म्हणाले की, मृतदेहाला रुग्णवाहिकी देतात की नाही, याबाबतचे नियम वैगेरे सगळं ठीक मात्र सरकारी काम करताना समोर आलेल्या व्यक्तीचे विनात्रास काम व्हायला हवे. मग ते तहसील कार्यालय असो ,पंचायत समिती असो, दवाखाना असो की पोलिस स्टेशन. तुम्ही अधिकारी कोणत्याही विभागाच्या असलात तरी सगळ्यात आधी तुम्ही एक माणूस आहात, हे लक्षात ठेवा असे आवाहन केले. यापुढे जर अशा घटना घडल्या तर एकाचीही गय केली जाणार नाही, अशी तंबीही भुसारा यांनी सरकारी यंत्रणाना दिली आहे. तसेच यावेळी मृत अजयचे वडील युवराज पारधी आणि कुटुंबियांना आर्थिक मदत करीत भुसारा यांनी धीर दिला.