अहमदनगर एमआयडीसीतील सन फार्मा कंपनीला भीषण आग ; एकाचा मृत्यू
X
अहमदनगर// नागापूर एमआयडीसीतील सन फार्मा कंपनीला काल रात्री भीषण आग लागल्याची घटना समोर आली. या घटनेत एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.आगीची माहिती मिळताच एमआयडीसी व अहमदनगर महानगरपालिकाच्या चार अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अग्निशमन दलाचे जवान, कंपनीतील कर्मचारी यांनी आग विझविण्यासाठी शर्थीने प्रयत्न केले. दरम्यान ही आग कशामुळे लागली याचे कारण अस्पष्ट आहे.
नागापूर एमआयडीसीत सन फार्मा ही कंपनी आहे. या कंपनीच्या आवारात वेगवेगळे प्लँट असून आतील एका प्लँटला काल रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास आग लागली. रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते. व्हक्युम पंप फुटल्यामुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दरम्यान आगी बाबत माहिती देण्यास कंपनी व्यवस्थापनाने नकार दिला. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे पथकासह घटनास्थळी दाखल झाले होते.