Home > News Update > सामाजिक कार्यकर्त्या सुमित्रा माधव भांडारी यांचे निधन

सामाजिक कार्यकर्त्या सुमित्रा माधव भांडारी यांचे निधन

सामाजिक कार्यकर्त्या सुमित्रा माधव भांडारी यांचे निधन
X

भारतीय जनता पार्टीचे नेते माधव भांडारी यांच्या पत्नी आणि सामाजिक कार्यकर्त्या सुमित्रा भांडारी यांचे काल रात्री पुण्यात अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे वय 60 वर्ष होतं.

भंडारी यांच्या प्रभात रस्त्यावरील निवासस्थानी सुमित्रा भांडारी यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे. आज दुपारी 4 वाजता पुण्यातील नवी पेठ परिसरातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याचे निकटवर्त्यांनी सांगितले.

सुमित्रा भांडारी या परभणीचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नानासाहेब वेलणकर यांच्या कन्या होत्या. विद्यार्थी दशेपासून त्या परभणीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थी चळवळीचे नेतृत्व करत होत्या. लग्नानंतर त्या कोकण विभागात विविध सामाजिक संघटना आणि संस्थासोबत काम करत होत्या. भांडारी यांच्या पत्नीच्या निधनाची माहिती मिळताच भाजपसह अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी वाहिली श्रद्धांजली


भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देखील ट्विट करत सुमित्रा भांडारी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.


Updated : 4 Jan 2023 2:00 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top