Sudhir Choudhary vs Smriti Irani सुधीर चौधरींची स्मृती इराणींनी काढली इज्जत
X
भारतीय माध्यमांवर अंकुश लावला जात असल्याचा सार्वत्रिक आरोप होतोय. त्यातही गोदी मीडिया विरूद्ध इतर माध्यमं असा सामना रोज पाहायला मिळतोय. मात्र, माध्यमांच्या स्वातंत्र्यावर नियंत्रण आणलं जात असल्याचं पुन्हा एकदा एका वृत्तवाहिनीवरील चर्चेतून सिद्ध झालंय. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smirti Irani) यांची मुलाखत आज तक या वृत्तवाहिनीचे संपादक सुधीर चौधरी यांनी घेतली. या मुलाखतीत त्यांनी वाढत्या महागाईवर स्मृती इराणींना थेट प्रश्न विचारला, त्यावर रागानं लाल झालेल्या स्मृती इराणींनी संपादक सुधीर चौधरी यांची ऑन एअर इज्जतच काढलीय.
आज तक या वृत्तवाहिनीच्या G20 या कार्यक्रमात स्मृती इराणी यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या चांगल्या कामांचा पाढाच वाचला तर विरोधकांच्या कामगिरीवर टीकाही केली. सुधीर चौधरी यांनी स्मृती इराणींना महागाईच्या प्रश्नावर थेट प्रश्न विचारला. त्यावर उत्तर न देता स्मृती इराणींनी सुधीर चौधरींना ते तुरूंगात असलेल्या प्रसंगाची आठवण करून दिली.
आज तक च्या G 20 कार्यक्रमात सुधीर चौधरी यांनी टोमॅटो महागाई संदर्भात प्रश्न विचारला की, जेव्हा टोमॅटो २५० रुपये ते ३०० रुपये झाले त्यावेळी तुमच्या घरात चर्चा व्हायची का ? असा थेट प्रश्न होता. त्यावर उत्तर देताना स्मृती इराणी म्हणाल्या, " आपण ट्रिबलाइज करत आहात त्यावरचं उत्तर न देता त्यांनी सुधीर चौधरींनाच प्रतिप्रश्न केला... सुधीरजी काय झाल तुम्ही जेल मध्ये होतात ? या प्रश्नावरून सध्या सोशल मिडीयावर स्मृती इराणी जोरदार ट्रोल होत आहेत.
यावर माजी मंत्री तथा काँग्रेसच्या नेत्या आमदार अॅड. यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या "स्मृती इराणींच्या घरात होत असेल नसेल पण जनतेच्या घरात मात्र टोमॅटो च्या दराची चर्चा होत असते. ज्यांना सामान्य माणसांचं काहीही देणं घेणं नाही असेच नेते इतकं असंवेदनशील उत्तर देऊ शकतात. भारतातील माध्यमांनीही आता बोध घेतला पाहिजे. असं ट्विट ठाकूर यांनी केलं आहे.