Home > News Update > Radhakrishna Vikhe Patil | गोसेवा आयोगाच्या प्रभावी अंमबजावणीसाठी प्रयत्नशील

Radhakrishna Vikhe Patil | गोसेवा आयोगाच्या प्रभावी अंमबजावणीसाठी प्रयत्नशील

मुंबईत गोसेवा आयोग आणि पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास विभगाची संयुक्त बैठक संपन्न

Radhakrishna Vikhe Patil | गोसेवा आयोगाच्या प्रभावी अंमबजावणीसाठी प्रयत्नशील
X

राज्यात सुरु झालेल्या गोसेवा आयोगाच्या प्रभावी अंमबजावणीसाठी आपण प्रयत्नशील आहे. त्यासाठी मिशन मोड काम सुरु आहे. सरकारच्या माध्यमातून नेहमीच याबाबतीत संपूर्ण सहकार्य करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज दिली.

गोसेवा आयोग आणि पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास विभगाची संयुक्त बैठक आज मुंबईतील सह्याद्री अतिथिगृह येथे संपन्न झाली. यावेळी आयोगाच्या ध्येय धोरणासह एकूणच आयोगाची कार्यप्रणाली आणि इतर महत्त्वाच्या सर्व विषयांवर सखोल चर्चा झाली. या चर्चेत गोसेवा आयोगाचच्या सदस्यांनी सहभाग घेतला. यावेळी मंत्री विखे पाटील यांनी राज्यातील गोशाळा वाढविण्याच्या दृष्टीने आणि गोसेवा आयोगाच्या माध्यमातून देशी पशुधनाचे संरक्षण, संगोपन आणि संवर्धन याबाबत अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

या बैठकीस गोसेवा आयोगाचे अध्यक्ष श्री. शेखर मुंदडा, अखिल भारतीय सहमंत्री विश्व हिंदू परिषद श्री शंकर गायकर, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभागाचे सचिव श्री. तुकाराम मुंढे, पशुसंवर्धन आयुक्त डॉ. हेमंत वसेकर, परीवहन आयुक्त श्री.विवेक भीमनवार यांच्यासह गोसेवा आयोगाचे सदस्य उपस्थित होते.

Updated : 11 Jan 2024 8:25 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top