पिसाळलेल्या कुत्र्याचा एकाच दिवसात अनेकांना चावा
X
जळगांव शहरातील वाघ नगर परिसरात एका पिसाळलेल्या कुत्र्याने उच्छाद मांडत दोन तासांच्या अवधीत तब्बल दहा बालकांनासह अनेकजणांना चावा घेतल्याची घटना घडली आहे. यामुळे शहरात सध्या भीतीचे वातावरण आहे. सर्व जखमी बालकांवर जिल्हा रुग्णालयाच्या बालरुग्ण विभागात उपचार सुरू असून त्यातील तिघे जण गंभीर जखमी आहेत. या घटनेत सर्वच बालक हे तीन ते दहा वयोगटातील असून बाहेर खेळत असताना पिसाळलेल्या कुत्र्याने त्यांना चावा घेतला आहे.
महापालिकेने काही महिन्यांपूर्वी कुत्र्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी निर्बीजीकरण करण्यात प्रयत्न करण्यात केला होता. मात्र काही प्राणीप्रेमी संघटनांनी याला विरोध केला होता. यामुळं शहरातील कुत्र्यांची संख्या मोठ्याप्रमाणात वाढली आहे. कुत्र्यांच्या निर्बीजीकरणाच्या कंत्राटावरूनही वाद झाला होता. या घटनेनंतर शहरातील बेवारस कुत्र्यांचा महापालिकेतर्फे बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी आता नागरिकांनी केली आहे. महापालिका प्रशासनाला मॅक्समहाराष्ट्रन भूमिका विचारली तेव्हा कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या घटना वाढल्या असून लवकरच बंदोबस्त करण्यात येईल असे सांगण्यात आले.