२ लाख रुपये किमतीचा गर्भपात आणि गुंगीच्या औषधांचा साठा जप्त
२ लाख रुपये किमतीचा गर्भपात आणि गुंगीच्या औषधांचा साठा अन्न आणि औषध प्रशासनाने जप्त केलाय. जालन्यातील अंबड तालुक्यातील पारनेर फाटयाजवळ ही कारवाई करण्यात आली. या कारवाईने जालना जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
X

या प्रकरणी अंबड पोलिसांनी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मोहंमद शोहेब , मोहम्मद आसिफ असं गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचं नाव असून तो बुलडाणा जिल्हयातील चिखली शहरातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. पारनेर फाटा येथे दोन तरुण गर्भपात आणि गुंगीच्या औषधांचा साठा विक्रीसाठी आणणार असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनाला मिळाली होती. या माहितीवरून या विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांची मदत घेऊन दोघा तरुणांना ताब्यात घेत विचारपुस केली असता संबधित औषधसाठा बाळगण्यासंदर्भातील कोणाताही परवाना या युवकांकडे नसल्याचं समोर आलं. दरम्यान अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकाने या युवकांना ताब्यात घेत औषधांचा साठा जप्त केला अशी माहिती अन्न आणि औषधी प्रशासन विभागाच्या निरीक्षक अंजली मिटकर यांनी दिली. दरम्यान अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे