Home > News Update > कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला

कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला

कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला
X

बागलकोट: गेल्या काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेच्या घटना समोर येत आहेत. आधी गोव्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर आता कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यात आला. रात्रीच्या अंधारात नगरपरिषदेकडून जेसीबी लावून कडक बंदोबस्तात हा पुतळा हटवण्यात आला आहे. यामुळे शिवप्रेमींमधून कर्नाटक सरकारविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यावरून भाजपने हल्लाबोल केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा हटवलेला पुतळा प्रशासनाची परवानगी न घेता उभारण्यात आला असल्याचा दावा नगरपरिषदेने केला आहे. त्यामुळे अवैधरित्या उभारण्यात आलेला पुतळा हटवल्याचे नगरपरिषदेने म्हटले आहे. त्यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कर्नाटक सरकार आणि काँग्रेसवर टीका केली.

दरम्यान यावर महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी खरमरीत टीका केली आहे ते म्हणाले की " शिवरायांचा पुतळा हटवणं हा संपूर्ण हिंदुस्तानाचा आणि कोट्यावधी शिवभक्तांचा अपमान आहे. कर्नाटकातील काँग्रेसची मुजोरी आम्ही सहन करणार नाही महापुरूषांचा सातत्यानं अपमाम करणं हे काँग्रेस धोरण झालं आहे. कर्नाटक सरकारं शिवरायांचा पुतळा सन्मानानं स्थापित करावा नाहीतर काँग्रेसला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. अशी प्रतिक्रिया बावनकुळे यांनी दिली आहे

यावर महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनीही प्रतिक्रिया दिली ते म्हणाले की " कर्नाटकमध्ये हटविलेला पुतळा अनधिकृत होता, त्याचा चेहरा शिवाजी महाराजांशी मिळत नव्हता, त्यामुळे तो हटवला आहे. असल्याचं वडट्टीवार यांनी सांगितले तर "भाजप सरकारच्या काळात 12,13 पुतळे हटविले त्यामुळे अभ्यास न करता बोलू नये, भाजप वाल्यांनी बोलू नये. अशी प्रत्युत्तर वडेट्टीवारांनी भाजपला दिलं आहे.

कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्याचे अनेक वेळा प्रकार समोर आले आहेत. अशातच दोन दिवसापूर्वी बागलकोट येथे बसवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अनधिकृत असल्याचे सांगत नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी हा पुतळा काढून टाकला आहे. यामुळे शहर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून भाजप व हिंदुत्ववादी संघटनांकडून या कारवाईला विरोध होत आहे.

कर्नाटकातील बागलकोट शहरात काल मध्यरात्री बारा वाजल्यापासून जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. जमावबंदीचे आदेश असताना देखील भाजपाने हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी शेकडोच्या संख्येने एकत्र येथे सहभाग घेतला. यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बागलकोट गदग विजापूर या भागात पोलिसांकडून कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने आजांनवर बंदी घालण्याचा आदेश दिलेला असताना देखील त्यांच्यावर कारवाई का होत नाही असाही प्रश्न यावेळी हिंदुत्ववादी संघटनांकडून विचारण्यात आला आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मी तेथे पुन्हा उभा करू असे तेथील माजी आमदारांनी म्हटले आहे.

Updated : 19 Aug 2023 12:48 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top