राज्य सरकारचा 16 महिन्यात प्रसिद्धी मोहिमेचा खर्च 155 कोटी
X
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने गेल्या 16 महिन्यात प्रसिद्धी मोहिमेवर तब्बल 155 कोटी खर्च केले आहेत, अशी माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी दिली आहे. गलगली यांनी यासंदर्भात माहिती अधिकार कायद्यांतर्गत माहिती मागवली होती. अनिल गलगली यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने महाविकास आघाडी सरकार स्थापनेपासून आजमितीला प्रसिद्धी मोहिमेवर करण्यात आलेल्या विविध खर्चाची माहिती मागितली होती. 11 डिसेंबर 2019 पासून 12 मार्च 2021 या 16 महिन्यात प्रसिद्धी मोहिमेवर केलेल्या खर्चाची माहिती उयामध्ये आहे. नियमित लसीकरण प्रचारावर सर्वाधिक 19.92 कोटींचा खर्च करण्यात आला आहे.
2020 मध्ये एकूण एकूण 104.55 कोटी खर्च करण्यात झाले आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियानावर 19.92 कोटी, विशेष प्रसिद्धी मोहिमेवर 4 टप्प्यात 22.65 कोटी खर्च करण्यात आले आहे. महाराष्ट्र नागरी विकास अभियानावर 3 टप्प्यात 6.49 कोटी खर्च करण्यात आले आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाने निसर्ग चक्रीवादळावर 9.42 कोटी खर्च केले असून यात 2.25 कोटींचा सोशल मीडियावर दर्शविला आहे. राज्य आरोग्य शिक्षण विभागाने 18.63 कोटी खर्च केले आहे. शिवभोजन थाळीच्या प्रसिद्धी मोहिमेवर 20.65 लाख खर्च केला आहे. तर 2021 मार्चपर्यंत 29.79 कोटींचा खर्च झाला आहे. यात राज्य आरोग्य शिक्षण विभागाने 15.94 कोटी खर्च केले आहे. जल जीवन मिशनच्या प्रसिद्धी मोहिमेवर 1.88 कोटी खर्च करण्यात आला आहे. सरकारने आणखीही माहिती वेबसाईटवर प्रसिद्ध करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.