Home > News Update > मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी पंतप्रधानांना भेटणार- मुख्यमंत्री

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी पंतप्रधानांना भेटणार- मुख्यमंत्री

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या लालफितीत अडकून पडलेला आहे. हा दर्जा मिळवून देण्यासाठी राज्याचे शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी ( NARENDRA MODI ) यांची भेट घेणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ग्वाही अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या भाषणात दिली.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी पंतप्रधानांना भेटणार- मुख्यमंत्री
X

आज मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा ( CLASSICAL LANGUAGE TO MARATHI ) देण्यासाठी साहित्य अकादमीने दिलेल्या अहवालावर निर्णय घेण्यासाठी केंद्र सरकारला आंतरमंत्री गट स्थापन करावयाचा होता. परंतु गेल्या एका वर्षापासून केंद्र सरकारने या गटाची स्थापनाच केलेली नाही. यामुळे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत प्रस्ताव केंद्र सरकारच्या लालफितीत अडकलेला आहे. याच दरम्यान मराठीला अभिजात भाषेचा दर्जा ( CLASSICAL LANGUAGE TO MARATHI ) देण्यासंदर्भात राज्याचे शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी ( NARENDRA MODI ) यांना भेटणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( EKNATH SHINDE ) यांनी अधिवेशनाच्या भाषणात दिली.

आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरवात झाली आहे. आणि आज मराठी भाषा गौरव दिन देखील आहे. त्यामुळे मराठीला अभिजात भाषेचा देण्यासंदर्भातील मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal) यांवी सभागृहात उपस्थित केला. यावर सभागृहातील सर्व सदस्यांच्या भावना लक्षात घेवून लवकरच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्यातील शिष्टमंडळासह पंतप्रधान नरेंद्र मोदी ( NARENDRA MODI ) यांची भेट घेणार असल्याचे शिंदे यांनी यावेळी सांगितले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत कार्यवाही लवकरात लवकर करावी, अशी विनंती करण्यात येईल, अशी ग्वाही सुद्धा एकनाथ शिंदे ( EKNATH SHINDE ) यांनी दिली.

Updated : 27 Feb 2023 9:28 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top