StateBudget अर्थसंकल्पीय अधिवेशन किमान पाच आठवडे घ्यावे; कामकाज सल्लागार समितीत मागणी
X
नागपूरचे हिवाळी अधिवेशन किमान तीन आठवडे घेण्याची विरोधी पक्षांनी मागणी असतानाही हिवाळी अधिवेशन तीन आठवडे घेण्यात आले नाही. त्यामुळे राज्यातील सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशन किमान पाच आठवड्याचे घेण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत केली.
विधानभवन येथे विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विधानसभा अध्यक्ष,अँड राहुल नार्वेकर,विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार,महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत दादा पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन,सर्वश्री छगन भुजबळ,अशोक चव्हाण, जयंत पाटील, ॲड.आशिष शेलार, छगन भुजबळ, सदस्य अमीन पटेल उपस्थित
विधिमंडळाचे सन 2023 चे पाहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार दिनांक 27 फेब्रुवारीपासून पासून विधान भवन, मुंबई येथे होणार आहे. दि.27 फेब्रुवारी ते 25 मार्च या कालावधीत अधिवेशनाचे कामकाज होणार आहे. अधिवेशनात राज्याचा वर्ष 2023-24या वर्षाचा अर्थसंकल्प गुरुवार दि 9 मार्च 2023 रोजी मांडला जाणार आहे.
मराठवाडा मुक्ती संग्रामाचा यंदा अमृतमहोत्सवी वर्ष आहे. हे वर्ष भव्य प्रमाणात साजरे व्हावे, अशी महाराष्ट्रवासियांची भावना आहे. त्यासाठी महाविकास आघाडी सरकारने अर्थसंकल्पात ५०० कोटींची घोषणा केली होती. मराठवाडा, महाराष्ट्रातील नागरिकांना, सर्वपक्षीय नेत्यांना सोबत घेऊन मराठवाडा मुक्ती संग्रामाचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्यात यावे, मराठवाडा मुक्तीचा संघर्ष नव्या पिढीपर्यंत घेऊन जावा, हा त्यामागचा प्रमुख उद्देश आहे असे अजित पवार म्हणाले.
यावेळी विधीमंडळ सदस्यांनी सभागृहात विविध आयुधांव्दारे उपस्थित केलेल्या प्रश्नांची योग्य, मुद्देसूद लेखी उत्तरे देण्यात यावीत, आदी मागण्या विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत केल्या.