मेस्मा काय आता टाडा लागला तरी माघार नाही, एसटी कर्मचारी ठाम
X
संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईबाबत आता परिवहन मंत्री अनिल परब यांनी कठोर भूमिका घेतली आहे. एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा कायद्याअंतर्गत कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. मात्र तरी देखील एसटी कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. मेस्माच काय आता टाडा सारखी शिक्षा दिली तरी विलीनीकरण झाल्याशिवाय मागे हटणार नाही, असा इशाराच संपकरी कर्मचाऱ्यांनी दिला आहे. बीड आगारात सुरू झालेल्या आंदोलनाला आता एक महिना पूर्ण झाला आहे. ऊन, वारा, पाऊस अशा कोणत्याही गोष्टींना न जुमानता या कर्मचा-यांनी आपलं आंदोलन सुरूच ठेवले आहे. कर्मचाऱ्यांनी आपला आता आगारात ठाण मांडले आहे.
यावेळी महिलांनी देखील बांगडी भरो आंदोलन तेले. सध्याच्या आघाडीमधील पक्ष विरोधात असताना एक मत व्यक्त करतात आणि सत्तेत असताना वेगळे मत व्यक्त करतात. त्यामुळे त्यांना जाग आणण्यासाठी या कर्मचाऱ्यांनी बांगडी आंदोलन करून आपला विरोध दर्शवला आहे. सरकारच्या धोरणामुळे एसटी कर्मचाऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ आली असल्याची प्रतिक्रिया या ठिकाणच्या एसटी कर्मचाऱ्यांनी दिल्या आहेत.