एसटी कर्मचारी संप : "मरण स्वीकारु पण माघार नाही", कर्मचारी ठाम
टीम मॅक्स महाराष्ट्र | 5 Dec 2021 11:13 AM IST
X
X
एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला आता महिना पूर्ण झाला आहे. आता आंदोलनाचा 32 वा दिवस आहे. आतापर्यंत एकट्या बीड जिल्ह्यात 553 एसटी कर्मचार्यांचे निलंबन करण्यात आले. दबाव टाकला जात असला तरी स्मशानात जाऊ पण आता माघार घेणार नाही, असा पवित्रा बीडमधील आंदोलक कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. सरकारमध्ये विलीनीकरण करा या प्रमुख मागणीसाठी बीड जिल्ह्यात गेल्या 32 दिवसांपासून एसटी कर्मचारी संपावर आहेत. "आमचं निलंबन करा, आमच्यावर मेस्मा लावा, टाडा लावा, मोक्का लावा, मात्र आम्ही माघार घेणार नाही" असा पवित्रा आंदोलक कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. दरम्यान आंदोलन फोडण्याचा प्रयत्न केला जातो असा आरोपही कर्मचाऱ्यांनी केला आहे. दरम्यान बीडमध्ये 5 एसटी कर्मचाऱ्यांविरोधात प्रशासनाने कोर्टात अवमान याचिका दाखल केली आहे.
Updated : 5 Dec 2021 11:13 AM IST
Tags: st workers ST Workers Strike
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire