एस.टी कर्मचाऱ्यांची दिवाळी पाथरी आगाराच्या गेटसमोर
X
परभणी : एस.टी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी एस.टी कामगार राज्यात बेमुदत संपावर आहेत. एस.टी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याची एस.टी कामगारांची प्रमुख मागणी मान्य करण्याबाबत राज्य सरकारकडून अद्याप कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्याने एस.टी कामगारांमध्ये संतापाचे वातावरण पाहायला मिळत आहे. ऐन दिवाळीत एस.टी महामंडळाचे कामगार संपावर गेल्याने प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत. एस.टी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीला 23 पैकी अनेक कामगार संघटनांनी पाठिंबा दिला आहे.
पाथरी आगारातील एस.टी कर्मचारी 4 नोव्हेंबरपासून संपात सहभागी झाले आहेत. एस.टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. एस.टी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याची कामगार संघटनांची प्रमुख मागणी आहे. 04 नोव्हेंबर रोजी पाथरी येथील आगारातील एस.टी कर्मचाऱ्यांनी गेटवरच दिवाळी साजरी केली.