Home > News Update > एसटी कर्मचारी अनिल कांबळे यांचा ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यू

एसटी कर्मचारी अनिल कांबळे यांचा ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यू

एसटी कर्मचारी अनिल कांबळे यांचा ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यू
X

कोल्हापूर // एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. कर्मचाऱ्यांचा संप बेकायदेशीर असल्याचं न्यायालयाने सांगितले आहे. मात्र तरीही कर्मचारी आंदोलनावर ठाम आहेत, त्यामुळे एसटी महामंडळाने कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत हजारो कर्मचाऱ्यांचे निलंबित करण्यात आलं आहे. तर काही कर्मचारी निलंबनाच्या भीतीने पुन्हा कामावर रुजू होऊ लागलेत.

मात्र, कोल्हापूरात एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात एक दुर्दैवी घटना घडली आहे. एसटी कर्मचारी अनिल कांबळे यांचा ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. अनिल यांनी निलंबनाच्या भीतीने मागील २ दिवसांपासून अन्न पाण्याचा त्याग केला होता. अनिल कांबळे हे सावंतवाडी आगारात चालक कम वाहक म्हणून कार्यरत होते.

परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाची बैठक पार पडली. दरम्यान या बैठकीत कोणताही सकारात्मक तोडगा निघाला नाही. या बैठकीबाबत पडळकर म्हणाले की, आजच्या बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही. अद्याप संप मागे घेतला नाही. १२ आठवड्यांची मुदत कमी करण्यासाठी सरकारने सकारात्मकता दाखवली आहे. समितीचा अहवाल येत नाही, तोवर सरकार काही करू शकत नाही, असं सरकारचं म्हणणं आहे.

Updated : 14 Nov 2021 8:41 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top