Home > News Update > संपात सहभागी न झालेल्या ST कर्मचाऱ्याने घेतले विष, अधिकाऱ्यांचा दबाव असल्याचा आऱोप

संपात सहभागी न झालेल्या ST कर्मचाऱ्याने घेतले विष, अधिकाऱ्यांचा दबाव असल्याचा आऱोप

संपात सहभागी न झालेल्या ST कर्मचाऱ्याने घेतले विष, अधिकाऱ्यांचा दबाव असल्याचा आऱोप
X

राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले आहे. सरकारनेही या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. पण आता बीडमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या संपात सहभागी न झालेल्या आणि कामावर जाणाऱ्या एका एसटी चालकाने बसस्थानकावरच विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. प

गारवाढ होत नाही , अधिकारीही ऐकत नाहीत, तुटपुंज्या पगारात कुटूंब चालवायचे कसे, असे म्हणत कर्तव्यावर चाललेल्या आष्टी आगारातील बाळू कदम या बसचालकाने कडा येथील बसस्थानकावर पिकांसाठी वापरण्यात येणारे औषध प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. आता जीव गेल्यावर तुम्ही आमच्याकडे लक्ष देणार का, असे म्हणत आष्टी आगाराच्या कर्मचा-यांनी काम बंद अंदोलन सुरू केले आहे.

गेल्या पंधरा दिवसापासून एस टी कामगारांचे काम बंद अंदोलन सुरू आहे. राज्यातील बहुतांश आगार बंद आहेत. पण काही ठिकाणी कर्मचारी कामार आहेत. आष्टी आगारातही कर्मचारी आपले काम सुरूळीतपणे करत आहेत. आष्टी आगारातील कर्मचा-यांनी संप केला होता, परंतु या आगारात भरपूर संघटना असल्याने काही संघटनांचे सदस्य कामावर जात आहेत.

नेमके घडले काय?

आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या बाळू कदम यांची प्रकृती संध्या चिंताजनक आहे. कदम यांच्या भावाने केलेल्या आरोपानुसार आष्टी आगाराचे आगार प्रमुख संतोष डोके यांनी वाहनचालक बाळू कदम यांना कामावर येण्यास सांगितले. पण बाळू कदम यांनी येण्यास नकार दिला. त्यानंतर अधिकाऱ्यांनी बडतर्फ करण्याचा इशारा दिला. त्यामुळे बाळू कदम यांना कामावर यायला लागले, आष्टी-पुणे ही जादा बस क्र.एमएच 20 बीएल 2086 बस घेऊन ते अडीचच्या दरम्यान पुण्याला निघाले. बस तीनच्या सुमारास कडा बसस्थानकावर आल्यानंतर बाळू वाहक यांनी एका कृषी दुकानात जाऊन औषध विकतत घेऊन ते प्यायले. त्यानंतर त्यांना कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले, पण त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी आष्टी येथील ग्रामिण रूग्णालयात दाखल करण्यात आले.

आपल्या भावाने कामावर जाणार नसल्याचे तीन दिवसांपूर्वीच आगार प्रमुखांना सांगितले होते. पण आगार प्रमुखांनी नोकरी गमवावी लागेल, असे सांगत त्यांना कामावर येण्यास सांगितल्यानेचच त्यांनी आत्महत्या केल्या आरोप संतोष कदम यांनी केला आहे.

Updated : 5 Nov 2021 3:34 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top