वंचित बहुजन आघाडीच्या आंदोलनाला यश, आजपासून राज्यांतर्गत बससेवा
X
कोरोनाच्या (corona) पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे (Lockdown) गेल्या ५ महिन्यांपासून सुरू असलेली एसटीची आंतरराज्य व राज्यांतर्गत सेवा बंद करण्यात आली होती. त्यापैकी राज्यांतर्गत सेवा म्हणजेच आंतरजिल्हा बससेवा २० ऑगस्टपासून म्हणजे आजपासून सुरू होणार आहे.
हे ही वाचा...
मुंबई आणि पुण्यानंतर नागपुरात एका दिवसात सर्वाधिक रुग्ण
“सुशांत प्रकरणाचा तपास CBIकडे देणे म्हणजे राज्याच्या अधिकारावर अतिक्रमण”
दाभोळकरांच्या हत्येच्या सूत्रधारांना अटक कधी होणार?- मुक्ता दाभोळकर
Covid 19: राज्याचा मृत्यूदर कधी घटणार?
परिवहनमंत्री अनिल परब (Anil Parab)यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्यामुळे गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा दिलासा मिळाला आहे. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) राज्यभरात एसटी सुरू करण्यासाठी आंदोलन केले होते. तसंच सरकारने तातडीने आंतरजिल्हा एसटी वाहतूक सुरू करण्याची मागणी त्यांनी केली होती.
कोणकोणत्या बस सुरू होणार?
एसटीची साधी, निमआराम, शिवशाही, शिवनेरी यासर्व प्रकारच्या बस सेवा सुरू होणार आहेत. या बसेसच्या तिकीट दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या बसेस टप्प्याटप्प्याने सुरु होत असून त्यापैकी लांब आणि मध्यम पल्ल्याच्या बसेसाठी आरक्षणाची सोय उपलब्ध करण्यात आलेली आहे. एसटीच्या प्रवासासाठी ई -पासची आवश्यकता आता लागणार नाहीय. पण प्रवासात प्रवाशांनी कोविड – १९ (covid-19) च्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. एसटी सेवा बंद असल्याने महामंडळाचे मोठे आर्थिक नुकसानही झाले होते.