Home > News Update > SSC Result : दहावीचा निकाल जाहीर, राज्यात 122 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण

SSC Result : दहावीचा निकाल जाहीर, राज्यात 122 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण

गेल्या अनेक दिवसांपासून दहावीचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागले होते. मात्र महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल जाहीर केला आहे. तर यामध्ये विभागनिहाय निकालाची घोषणा करण्यात आली आहे.

SSC Result : दहावीचा निकाल जाहीर,  राज्यात 122 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण
X

कोरोना महामारीच्या काळात विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यात आले. मात्र परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन यावरून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. मात्र त्यानंतर राज्य सरकारने परीक्षा ऑफलाईन घेतली. तर आता या परीक्षेचा निकाल महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केला आहे. यामध्ये 122 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत. 83 हजार 60 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहे.

९६.९४ टक्के उत्तीर्ण

दहावीच्या परीक्षेसाठी राज्यातील नऊ विभागांमधून 15 लाख 84 हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेचा फॉर्म भरला होता. त्यापैकी 15 लाख 68 हजार 977 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली. त्यापैकी 15 लाख 21 हजार 3 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर एकूण राज्याची उत्तीर्णता 96.94 टक्के इतकी असल्याचे समोर आले आहे.

79.06 टक्के रिपीटर्स उत्तीर्ण

राज्यात 54 हजार 159 विद्यार्थ्यांनी रिपीटर्स म्हणून परीक्षेचा फॉर्म भरला होता. मात्र त्यापैकी 52 हजार 351 विद्यार्थी परीक्षेला बसले. त्यापैकी ४१ हजार 390 विद्यार्थी दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.

दहावीच्या निकालात कोकण विभागाची बाजी

दहावीच्या निकालात कोकण विभागाने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. तर त्यात उत्तीर्णतेची टक्केवारी 99.27 टक्के इतकी आहे. तर नाशिक विभाग 95.90 टक्क्यांसह तळाला असल्याचे दिसून आले.

दहावीच्या निकालात पुन्हा एकदा मुलींचाच डंका

दहावीच्या निकालात पुन्हा एकदा मुलींनीच बाजी मारली आहे. त्यामध्ये मुलांपेक्षा 1.90 टक्के मुली उत्तीर्ण होण्याचे प्रमाण जास्त आहे. राज्यात मुली 97.96 टक्के उत्तीर्ण झाल्या आहेत. मात्र मुलांचे प्रमाण 96.06 टक्के इतके आहे.

12 हजार 210 शाळांचा निकाल 100 टक्के

राज्यातील 22 हजार 921 शाळांमधून विद्यार्थी परीक्षेला बसले होते. मात्र त्यापैकी 12 हजार 210 शाळांचा निकाल 100 टक्के इतका लागला आहे.

दिव्यांग विद्यार्थ्यांचेही उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 90 टक्क्यांच्या पलिकडे

राज्यात दहावीच्या परीक्षेत 8 हजार 29 दिव्यांग विद्यार्थी परीक्षेला बसले होते. मात्र त्यापैकी 7 हजार 579 दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर या विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 94.40 टक्के इतकी आहे.

दहावीचा निकाल कसा पहावा?

दहावीचा निकाल पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

https://mahresult.nic.in/

mahresult.nic.in


Updated : 17 Jun 2022 1:02 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top