पनवेल ते रत्नागिरीदरम्यान कोकण रेल्वेची विशेष मेमू सेवा
X
रत्नागिरी- प्रवाशांची गैरसोय दूर करण्याच्या कोकण रेल्वेने महत्वाच पाऊल उचललं आहे. कोकण रेल्वे ने प्रवास करताना सातत्याने गर्दीचा सामना हा कोकणकरानां करवा लागतोय याचं अनुषंगाने कोकण रेल्वेने पनवेल ते चिपळूण आणि रत्नागिरी दरम्यान अनारक्षित विशेष मेमू गाड्या चालविण्यचा मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ३१ मार्चपर्यंत प्रत्येक रविवारी दोन्ही बाजूने दोन मेमू गाड्या धावणार आहेत. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांची मोठी गैरसोय टळेल, असा विश्वास कोकण रेल्वेने व्यक्त केला आहे.
पनवेल- रत्नागिरी (०११५७) ही विशेष अनारक्षित मेमू गाडी ४ फेब्रुवारी ते ३१ मार्चपर्यंत प्रत्येक रविवारी रात्री ८:२५ वाजता पनवेल स्थानकातून सुटेल. तर ती दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजता रत्नागिरी स्थानकावर पोहचेल. तसेच चिपळूण- पनवेल ( ०११५८) ही विशेष अनारक्षित मेमू गाडी ४ फेब्रुवारी ते ३१ मार्च यादरम्यान प्रत्येक रविवारी दुपारी १५:२५ वाजता चिपळूण स्थानकातून सुटेल. ती त्याच दिवशी रात्री ८:१५ वाजता पनवेल स्थानकात पोहचेल. ही मेमू विशेष गाडी अंजनी, खेड, कळंबणी बुद्रूक, दिवाणखावटी, विन्हेरे, करंजाडी, सापे वामणे, वीर, गोरेगाव रोड, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा, निडी, नागोठणे, कासू, पेण, हमरापूर, जिते, आपटा, रसायनी आणि सोमाटणे या स्थानकांवर थांबेल, असे कोकण रेल्वेने स्पष्ट केले आहे.