कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना मातृशोक, पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केले दुःख
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या आईचे 27 ऑगस्ट रोजी इटलीतील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले.
X
28 ऑगस्टला काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीत सोनिया गांधी, राहूल गांधी आणि प्रियंका गांधी हे गांधी परिवारातील सदस्य इटलीमधून सहभागी झाले होते. यानंतर पूर्ण गांधी परिवार CWC च्या बैठकीला अशा प्रकारे परदेशातून सहभागी होत असल्यावर प्रश्न उपस्थित केले.
त्यावर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्वीट करून सोनिया गांधी यांच्या आईचे निधन झाल्याचे सांगितले. यामध्ये जयराम रमेश यांनी म्हटले आहे की, सोनिया गांधी यांच्या आईचे 27 ऑगस्ट 2022 रोजी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.
Condolences to Sonia Gandhi Ji on the passing away of her mother, Mrs. Paola Maino. May her soul rest in peace. In this hour of grief, my thoughts are with the entire family.
— Narendra Modi (@narendramodi) August 31, 2022
पंतप्रधान मोदींनी व्यक्त केले दुःख
सोनिया गांधी यांच्या आई पावला मायनो यांचे निधन झाल्यानंतर सोनिया गांधी यांच्या आई पावलो माईनो यांना भावपुर्ण श्रध्दांजली. या दुःखद प्रसंगी माझे विचार सोनिया गांधी यांच्या कुटूंबासोबत आहेत, असं पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट करून म्हटले आहे.
Sad to learn about the passing away of Mrs. Paola Maino, mother of Congress President Smt. Sonia Gandhi. My heartfelt condolences to her and her family. May God give her strength to bear this irreparable loss.
— President of India (@rashtrapatibhvn) August 31, 2022
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही व्यक्त केले दुःख
Sad to learn about the passing away of Mrs. Paola Maino, mother of Congress President Smt. Sonia Gandhi. My heartfelt condolences to her and her family. May God give her strength to bear this irreparable loss.
— President of India (@rashtrapatibhvn) August 31, 2022