Home > News Update > Bharat jodo yatra : सोनिया गांधींच्या उपस्थितीत शेगावात सभा होणार.

Bharat jodo yatra : सोनिया गांधींच्या उपस्थितीत शेगावात सभा होणार.

. ही पदयात्रा आता राहुल गांधी यांची राहिली नाही, ती देशाच्या जनतेची झाली आहे. त्यामुळे सोनिया गांधी शेगावच्या सभेला हजर राहून लोकांना संबोधित करतील.

Bharat jodo yatra : सोनिया गांधींच्या उपस्थितीत शेगावात सभा होणार.
X

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या वाशिम जिल्ह्यात आहे, ही यात्रा कन्याकुमारीपासून सुरु झाली होती. ही पदयात्रा १८ नोव्हेंबरला शेगावमध्ये पोहचणार असल्याने, 'काँग्रेस'च्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी देखील पदयात्रेत उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माहिती दिली.गेल्या काही दिवसांपूर्वी शेगाव येथील सभेच्या नियोजनासाठी काँग्रेसचे नेते बारकाई लक्ष ठेऊन असल्याने ही सभा ऐतिहासिक कशी होऊ शकते, याकडे 'काँग्रेस'च्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

तसेच केंद्रसरकारने वाढवलेली माहागाई, बेरोजगारी, तरुणांचे शैक्षणिक प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, या व्यतिरीक्त लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी राहुल गांधी यांनी ही यात्रा काढलेली होती. राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात सभा घेऊन केंद्रसरकारला देखील जनतेच्या समस्यांबद्दल केंद्रात आवाजउठवणार असल्याचे लोकांना आश्वासन दिले आहे. महाराष्ट्रातील सगळ्य़ा सभा रेकॉर्ड ब्रेक कश्या होतील, हे शेगावच्या सभेवरून लोकांना कळेल अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. ही पदयात्रा आता राहुल गांधी यांची राहिली नाही, ती देशाच्या जनतेची झाली आहे. त्यामुळे सोनिया गांधी शेगावच्या सभेला हजर राहून लोकांना संबोधित करतील. अशी माहिती नाना पटोले यांनी दिली,

Updated : 16 Nov 2022 2:54 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top