राणा दाम्पत्या पाठोपाठ सोमय्याचाही खोटारडेपणा उघड
मुंबई पोलिसांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून राणा दाम्पत्याचा खोटेपणा उघड केल्यानंतर भाजपचे वादग्रस्त नेते किरीट सोमय्या यांचीही बनवेगिरी आता भाभा रुग्णालयाने उघड केली आहेत.किरीट सोमय्यांना कोणतीही मोठी जखम नाही असा रुग्णालयाचा अहवाल आता पुढे आला आहे.
X
मुंबई पोलिसांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून राणा दाम्पत्याचा खोटेपणा उघड केल्यानंतर भाजपचे वादग्रस्त नेते किरीट सोमय्या यांचीही बनवेगिरी आता भाभा रुग्णालयाने उघड केली आहेत.किरीट सोमय्यांना कोणतीही मोठी जखम नाही असा रुग्णालयाचा अहवाल आता पुढे आला आहे.
राणा दाम्पत्याने मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठणाचा अट्टाहास धरल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात राज्य सरकारला आव्हान दिल्याप्रकरणी त्यांच्यावर आयपीसी कलम १२४ अ अंतर्गत राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला. अखेर न्यायालयीन सुनावणीत राणांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीही सुनावण्यात आली.
म या वादात भाजपने अधिकृतरित्या उडी घेतली आहे. सोमय्या यांनी राणांना भेटायला जाण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांच्या गाडीवर संतप्त शिवसैनिकांनी चपलांचा पाऊस बरसवला. यावेळी सोमय्यांच्या गाडीवर दगड भिरकावण्यात आला. यामध्ये ते जखमी झाल्याचा दावा करण्यात आला.
याउलट शिवसैनिकांनी त्यांच्या संघावर सोमय्यांनी गाडी घालण्याचा प्रयत्न केला असा आरोप केला होता.
सोमय्यांना जखम झाल्यानंतर त्यांनी रुग्णालयात जाण्याऐवजी त्याच ठिकाणी गाडीत ठिय्या देण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांच्या हनुवटी जवळून रक्त येत होतं. या जखमेची मोठी चर्चाही झाली. अखेर रुग्णालयाचा अहवाल आला आहे.
किरीट सोमय्या यांची तपासणी केल्यानंतर भाभा हॉस्पिटलने मुंबई पोलिसांना अहवाल सादर केला आहे. त्यांच्यावर जमावाने खार पोलीस ठाणे परिसरात हल्ला केला होता. त्यानंतर पोलिसांनी सोमय्यांची तक्रार नोंदवून घेतली. यावेळी करण्यात आलेल्या वैद्यकीय चाचणीत महत्वाची माहिती समोर आली आहे.
सोमय्या याची जखम 0.1 सेमीचा कट आहे.कोणतीही सूज नाही.रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात नाही. कोणतीही मोठी दुखापत झाली नाही.पोलिसांनी छळ केल्याचा आरोप आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी केला होता. त्यानंतर मुंबई पोलिसांनी खार पोलीस स्टेशनचा व्हिडिओ प्रसिद्ध केल्यानंतर त्यांची बोलती बंद झाली आहे. आता सोमय्या देखील काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.