जालना जिल्ह्यातील काही शेतकरी अजूनही अनुदानाच्या प्रतीक्षेत
X
जालना : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी जालना जिल्ह्याला 425 कोटी 99 हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. शेतकऱ्यांच्या खात्यावर दिवाळीपूर्वी हा जमा होणं अपेक्षित होतं, पण अद्याप काही शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा झाली नाही. मात्र, जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम मिळाली आहे. त्यामुळे कही खुशी कही गम अशीच काहीशी परिस्थिती जिल्ह्यातील शेतकऱ्यांची झाली आहे.
जिल्ह्यातील 5 लाख 15 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर 381 कोटी 73 लाख 30 हजार रुपये जमा करण्यात आले आहेत. जालना तालुक्यातील 84 हजार 523 शेतकऱ्यांच्या खात्यावर 68 कोटी 3 लाख 84 हजार रुपयांचा निधी जमा करण्यात आला आहे, तर बदनापूर 40 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर 34 कोटी 52 लाख 81 हजार , भोकरदन 72 हजार 860 शेतकऱ्यांना 44 कोटी 58 लाख दोन हजार , जाफराबाद 64 हजार 471 शेतकऱ्यांच्या खात्यावर 25 कोटी 42 लाख 68 हजार , परतूर 48 हजार 168 शेतकऱ्यांच्या खात्यावर 35 कोटी 48 लाख 84 हजार , मंठा ५२ हजार ७६२ शेतकऱ्यांच्या खात्यावर ३८ कोटी ३८ लाख ७५ हजार , अंबड तालुक्यातील 82 हजार शेतकऱ्यांच्या 74 कोटी 13 लाख 51 हजार आणि घनसावंगी तालुक्यातील 70 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर 61 कोटी 14 लाख 85 हजार रुपयांचा निधी जमा करण्यात आला आहे.
महसूल विभागाने वेळीच अतिवृष्टीची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी जेणेकरून ही मदत शेतकऱ्यांना रब्बीच्या खते - बियाणे खरेदी करिता कामी पडेल तसेच शेतकऱ्यांची दिवाळी देखील गोड होईल असं शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.