Home > News Update > 'बिल्किस बानो के रेपिस्ट 'ब्राह्मण और उनमें अच्छे संस्कार थे' भाजप आमदाराचं विधान

'बिल्किस बानो के रेपिस्ट 'ब्राह्मण और उनमें अच्छे संस्कार थे' भाजप आमदाराचं विधान

बिल्किस बानो के रेपिस्ट ब्राह्मण और उनमें अच्छे संस्कार थे भाजप आमदाराचं विधान
X



बिल्किस बानो या महिलेवर 2002 च्या गुजरात गोध्रा दंगली दरम्यान सामुहिक बलात्कार करण्यात आला. या प्रकरणातील 11 आरोपींची सजा माफ केल्यानं देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. मानवाधिकार कार्यकर्ते, इतिहासकार आणि माजी सनदी अधिकाऱ्यांसह देशातील प्रतिष्ठित व्यक्तींनी सर्वोच्च न्यायालयाला या आरोपींची सजा माफ करू नये. असं पत्रही लिहिलं आहे. त्या दरम्यान गुजरातचे भाजप आमदार सी. के. राउलजी विधानाबाबत सोशल मीडियावर संताप व्यक्त करण्यात येत आहे..


2002 च्या गुजरात दंगलीतील काही दोषी हे "ब्राह्मण" आहेत. त्यांचे चांगले "संस्कार" आहेत. शक्यतो त्यांच्या कौटुंबाच्या भूतकाळातील कारवायांमुळे त्यांना गोवण्यात आलं असावे. तसंच 15 वर्षे कारागृहात राहिलेले हे लोक गुन्हामध्ये सहभागी होते की नाही मला माहिती नाही.


https://twitter.com/ysathishreddy/status/1560222127110094849?s=20&t=Ahxu63Z0t_50VBq5WYxksg


काय आहे प्रकरण?


बिल्कीस बानो प्रकरणातील 11 पैकी एका दोषीने त्यांची सुटका व्हावी. म्हणून सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने भाजपशासित गुजरात सरकारला शिक्षेतून सूट देण्याबाबत विचार करण्यास सांगितले होते. त्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली होती.या समितीत भाजपच्या दोन सदस्यांचाही समावेश करण्यात आला होता. त्यामध्ये भाजप आमदार सीके राउलजी यांचाही समावेश होता.


पंचमहल येथील जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने दोषींच्या सुटकेची शिफारस केली होती. समितीच्या शिफारसी नंतर दोषींची सुटका करण्यात आली.


15 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून एकीकडे देशातील महिलांचा सन्मान करण्यासंदर्भात देशाला संबोधित करत होते. तर दुसरीकडे ते मुख्यमंत्री असताना गुजरातमध्ये महिलेवर झालेल्या बलात्कार प्रकरणी दोषींची सजा कमी करून दोषींना सोडण्यात येतं होते. या 11 दोषींची 15 ऑगस्टला देश अमृतमहोत्सव उत्साहाने साजरा करत असताना सुटका झाल्यानंतर देशात अनेक लोकांनी संताप व्यक्त केला.


चार दिवसांपूर्वी 2002 च्या बिल्किस बानो बलात्कार प्रकरणात 11 दोषींना जन्मठेपेची शिक्षा पूर्ण होण्यापूर्वीच सोडण्यात आले होते. मुंबईतील विशेष केंद्रीय अन्वेषण ब्युरोच्या (सीबीआय) न्यायालयाने बिल्कीस बानो बलात्कार प्रकरणात 21 जानेवारी 2008 ला 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. विशेष सीबीआय न्यायालयाने दिलेली ही शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली होती. या 11 लोकांनी बिल्कीस बानो यांच्या घरातील 7 लोकांची हत्या केली होती.

21 वर्षाच्या असताना बिल्किस बानो यांच्यावर सामुहिक अत्याचार झाला होता. तेव्हा त्या 5 महिन्यांच्या गरोदर होत्या. गोध्रा ट्रेनला आग लागल्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. मृतांमध्ये त्यांच्या ३ वर्षांच्या मुलीचाही समावेश होता.

Updated : 19 Aug 2022 4:27 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top