Home > News Update > अनोखा उपक्रम :सोशल मीडियातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला आर्थिक मदत

अनोखा उपक्रम :सोशल मीडियातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला आर्थिक मदत

सोशल मीडिया केवळ शेरेबाजी आणि ट्रॉलिंग साठी वापरला जात नाही याचं मूर्तीमंत उदाहरण ठरत फेसबुकवरील ख्यातनाम कुबेर ग्रुपतर्फे संचलीत करण्यात येणार्‍या कुबेर फाऊंडेशन या सामाजिक संस्थेने कोविड संकटात मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दोन लाख रुपयांची आर्थिक मदत केली आहे.

अनोखा उपक्रम :सोशल मीडियातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला आर्थिक मदत
X

कुबेर समूहाची समाजाभिमुख वाटचाल ही आजवर अनेकांच्या कौतुकाचा विषय बनली आहे. याच समूहातर्फे कोरोना महामारीने संपूर्ण जगाला विळखा घातला असतांना फेसबुक वरील कुबेर समुहाकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधे दोन लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली.

साधारणपणे आठ वर्षांपूर्वी संगमनेर येथील उद्योजक संतोष जगन्नाथ लहामगे यांनी फेसबुकवर कुबेर नावाच्या समुहाची स्थापना केली. शिक्षण, कला, क्रिडा , राजकारण , समाजकारण इत्यादी क्षेत्रातील सुमारे अडीच हजार समविचारी लोकांचा हा समूह वेळोवेळी आपल्या सामाजिक जाणिवा जपत समाजासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतो.


याच समाजभावनेमधून यापूर्वीही समुहाने उस्मानाबाद जिल्ह्यातील राजोरी गावातील नदीचे रुंदीकरण ,पश्‍चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदत , रक्तदान शिबिरे, शहादा तालुक्यातील आदिवासी लोकांचे सर्वरोग निदान शिबीर,महाराष्ट्रातील विविध ठिकाणचे वृद्धाश्रम असो वा अनाथ आश्रमात सामाजिक उपक्रम राबविले आहेत. मुलांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप , व्यसनमुक्ती केंद्रातील लोकांसाठी प्रबोधनात्मक कार्यक्रम , वृद्धाश्रमातील लोकांसाठी वैयक्तिक आरोग्यदायी वस्तूंचे वाटप त्याचप्रमाणेप्रकाश आमटे, श्री व सौ. कोल्हे दांपत्याच्या मेळघाटातील संस्थेसाठी आर्थिक मदत , सिंधुताई सपकाळ यांच्या संस्थेला आर्थिक मदत इत्यादी उपक्रम यापूर्वीही केलेले आहेत.

दरम्यान, अलीकडच्या काळात कोरोनाचा वाढता कहर पाहता या समुहाने महाराष्ट्रातील करोनाग्रस्त जनतेसाठी आर्थिक मदत म्हणून मुख्यमंत्री सहाय्यतानिधीत दोन लाख रुपयांचा निधी द्यावा आसा ठराव फाऊंडेशनचे अध्यक्ष संतोष लहामगे , उपाध्यक्ष प्रशांत जोशी ,कार्याध्यक्ष चंद्रकांत माने, सचिव सौ. मिनल गिरडकर , खजिनदार नंदू सावंत, प्रवक्ते डॉ. प्रशांत दौंडकर, कुबेर फाऊंडेशनचे सर्व संचालक मंडळ तसेच फाऊंडेशनचे सदस्य डॉ.अभिजित कदम, अ‍ॅड. लीना प्रधान-गुरव ,जतीन तिवारी, शैलेश कलंत्री , अमेय सोनावणे , नितीन नरखडे , प्रशांत दाते,विजया शिंदे, राहुल बेलदरे यांच्या संमती पारीत करण्यात आला.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या मदतीचा धनादेश महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात,नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी कुबेर फाऊंडेशनचे सन्माननीय सदस्य अ‍ॅड. प्रशांत गुंजाळ , सचिन गणोरे , शोहरब पठाण , अमोल बस्ते , प्रथमेश बेल्हेकर , गौरव डोंगरे, कृष्णा कापकर आदी उपस्थित होते.

Updated : 8 May 2021 7:15 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top