Home > News Update > सामाजिक कार्यकर्ते शेखर सोनाळकर यांच वयाच्या 72व्या वर्षी निधन

सामाजिक कार्यकर्ते शेखर सोनाळकर यांच वयाच्या 72व्या वर्षी निधन

सामाजिक कार्यकर्ते शेखर सोनाळकर यांच वयाच्या 72व्या वर्षी निधन
X

सामाजिक कार्यकर्ते प्रा. शेखर सोनाळकर यांची प्रकृती मागील काही दिवसापासून चिंताजनक होती. जळगाव येथील गाजरे हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. आज मध्यरात्री 1 वाजून 15 मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शेखर सोनाळकर वयाच्या 72 व्या वर्षी त्यांचं निधन झाले. त्यांना 4 ऑगस्ट रोजी राहत्या घरी सकाळी 9 ते 12 वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी ठेवले जाणार आहे . त्यानंतर नेरी नाका स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात येणार आहे.

शेखर सोनाळकर यांचा जीवनप्रवास

शेखर सोनाळकर ह्यांचा समाजवादी तसेच पुरोगामी चळवळ खान्देशांत रुजवण्यासाठी मोठा वाटा आहे. आणीबाणी ला विरोध केल्याने सोनाळकर ह्यांना कारागृहात ही जावं लागलं होत. डॉ श्रीराम लागू आणि निळू फुले यांच्या बरोबर 'सामाजिक कृतज्ञ निधी' संस्थेचे विश्वस्त म्हणून त्यांनी काम पहिले आहे. 'छात्र युवा वाहिनी' संघटनेचे सदस्य म्हणून अनेक वर्ष त्यांनी काम केलं आहे. त्यांनी 'राष्ट्रीय सेवा दला'चे कार्यकर्ते म्हणून काम केलं आहे. सामाजिक तसेच राजकीय प्रश्नांचे गाढे अभ्यासक होते 'एक गाव एक पाणवठा' ह्या चळवळीतही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. जनता दल पक्षाकडून निवडणूकही लढवली आहे. आम आदमी पार्टी या पक्षासाठी त्यांनी काम केलं आहे.

Updated : 4 Aug 2023 8:57 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top