Home > News Update > नव्या वर्षात चप्पल आणि बुटांच्या किमती वाढणार ; नव्या वर्षात १२ टक्के जीएसटी लागणार

नव्या वर्षात चप्पल आणि बुटांच्या किमती वाढणार ; नव्या वर्षात १२ टक्के जीएसटी लागणार

नव्या वर्षात चप्पल आणि बुटांच्या किमती वाढणार ; नव्या वर्षात १२ टक्के जीएसटी लागणार
X

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली ४६ वी जीएसटी परिषद नुकतीच संपन्न झाली आहे. या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आलाय, जीएसटी परिषदेने १७ सप्टेंबरला झालेल्या आधीच्या बैठकीत कपड्यांवरील जीएसटी दरवाढीचा निर्णय या बैठकीत स्थगित केला आहे. यामुळे फेब्रुवारी २०२२ पर्यंत कपड्यांवरील ५ ते १२ टक्क्यांची जीएसटी दरवाढ पुढे ढकलली आहे. तर, दुसरीकडे चप्पल आणि बुटांवरील जीएसटी दरवाढीचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे नव्या वर्षात चप्पल आणि बुटांच्या किमती वाढणार आहे.

या बैठकीत तामिळनाडू, पश्चिम बंगालसह अनेक राज्यांनी कपडे आणि चप्पल बुटांवर जीएसटी वाढीच्या निर्णयाला विरोध दर्शविला आहे. त्यामुळे केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांनी कपड्यांवरील जीएसटी दरवाढीचा निर्णय फेब्रुवारी २०२२ पर्यंत स्थगित केला आहे.

सद्यस्थितीत देशात मानवनिर्मित फायबरवर (MMF) १८ टक्के जीएसटी दर आहे. एमएमएफ यार्नवर १२ टक्के आणि कपड्यांवर ५ टक्के जीएसटी दर आहे. मात्र, सप्टेंबर २०२१ मध्ये झालेल्या मागील जीएसटी बैठकीत कपडे आणि चप्पल बुटांच्या जीएसटी दराच्या रचनेत बदल करण्याचा निर्णय घेतला होता.

जीएसटी परिषदेच्या बैठकीत १ जानेवारी २०२२ पासून सर्व पादत्राणांवर १२ टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा दर सर्व किमतीच्या वस्तूंसाठी सारखाच असणार आहे. त्यामुळे तुमची चप्पल अथवा बूट १०० रुपयांचे असो की १००० रुपयांचे त्या सर्वांवर १२ टक्के जीएसटी द्यावा लागणार आहे. चप्पल बुटांचा जीएसटी दर कमी करण्यावर पुढील बैठकीत निर्णय होईल असंही सांगण्यात आलं आहे.

Updated : 31 Dec 2021 7:41 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top