Home > News Update > #SJ182 श्रीविजय एअरचे विमान बेपत्ता, 60 लोकांचा जीव धोक्यात...

#SJ182 श्रीविजय एअरचे विमान बेपत्ता, 60 लोकांचा जीव धोक्यात...

श्रीविजय एअर फ्लाइट चा संपर्क तुटला, विमान हवेतच गायब, 64 लोकांचा जीव धोक्यात, विमान समुद्रात कोसळल्याची शक्यता...

#SJ182 श्रीविजय एअरचे विमान बेपत्ता, 60 लोकांचा जीव धोक्यात...
X

इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथे आज उड्डाण केलेलं एक प्रवासी विमान रडार वरून गायब झालं आहे. या विमानात साधारण 62 प्रवासी असल्याची माहिती आहे. हे विमान श्रीविजय एअरचे असून बोइंग 737 प्रकारचं हे विमान आहे.

या विमानाने उड्डान केल्यानंतर अवघ्या 4 मिनिटानंतर या विमानाचा हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटल्याचं Airport Authority ने म्हटलं आहे. जावाच्या समुद्रात हे विमान कोसळल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण जकार्ताच्या विमानतळावरून जकार्ताचा समुद्र पार करण्यासाठी 90 ते 95 मिनिटं लागतात.

प्रकारच्या या विमानात ६२ प्रवासी होते. उड्डाणानंतर काही मिनिटात या विमानाचा हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. हे विमान समुद्रात कोसळल्याची शक्यता आहे.

विमानाच्या हालचाली बाबत फ्लाइट रडार २४ च्या टि्वटर अकाऊंटवर माहिती देण्यात आली आहे.


Updated : 9 Jan 2021 11:20 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top