Home > News Update > महावितरणचा ग्राहकांना मोठा दिलासा, वीजबील सुरक्षा ठेव भरण्यास सहा हप्त्यांची सोय

महावितरणचा ग्राहकांना मोठा दिलासा, वीजबील सुरक्षा ठेव भरण्यास सहा हप्त्यांची सोय

महावितरणने वीज सुरक्षा ठेव रकमेत वाढ करुन ग्राहकांना झटका दिला असतानाच आता वीज सुरक्षा ठेव रक्कम सहा मासिक हप्त्यात भरण्याची मुभा दिली आहे.

महावितरणचा ग्राहकांना मोठा दिलासा, वीजबील सुरक्षा ठेव भरण्यास सहा हप्त्यांची सोय
X

गेल्या काही दिवसांपासून राज्यात वीज संकटामुळे लोकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यापार्श्वभुमीवर महावितरणने वीजबील सुरक्षा ठेव रक्कम दुप्पट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. तर या निर्णयामुळे वीज ग्राहकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र महावितरणने ग्राहकांना मोठा दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यात वीज संकटामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच वीजबीलाच्या सुरक्षा ठेवीत वाढ करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. त्यामुळे त्याचा ग्राहकांना मोठा फटका बसणार आहे. मात्र या निर्णयामुळे सामान्य नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त केला. त्यामुळे अखेर महावितरणने वीजबील सुरक्षा ठेव भरण्यास सहा हप्त्यांची मुदत दिली आहे.

वीजबील सुरक्षा ठेव रक्कम पुर्वी एक महिन्याच्या वीजबीलाइतकी होती. मात्र त्यामध्ये आता दुप्पट वाढ झाल्यामुळे ती रक्कम दुप्पट होणार आहे. त्यामुळे ही रक्कम ग्राहकांना एकरकमी भरणे शक्य नव्हते. त्यामुळे महावितरणने ही रक्कम सहा मासिक हप्त्यात वीज भरण्यास मंजूरी दिली आहे. त्यामुळे हा ग्राहकांना मोठा दिलासा मानला जात आहे.

कशी निश्चीत केली जाते सुरक्षा ठेव रक्कम?

आर्थिक वर्ष संपल्यानंतर महावितरण कंपनी ग्राहकांचा मागिल एक वर्षातील सरासरी वीज वापर आणि वीजेचे दर या आधारे नवीन सुरक्षा रक्कम निश्चित करते. तसेच ज्या ग्राहकांचा वीज वापर कमी असेल किंवा त्या ग्राहकांनी त्या रकमेतील फरक वीजबीलात कपात करून दिला जातो, अशा प्रकारे वीज सुरक्षा ठेव रकमेची निश्चीती केली जाते.

Updated : 23 April 2022 7:44 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top