Home > News Update > Cyclone Sitrang : बंगालच्या उपसागरात सितरंग चक्रीवादळ पण धोका नेमका कुणाला?

Cyclone Sitrang : बंगालच्या उपसागरात सितरंग चक्रीवादळ पण धोका नेमका कुणाला?

देशात मान्सूनने परतीच्या प्रवासात अक्षरशः धुमाकुळ घातला. त्यापाठोपाठ बंगालच्या उपसागरात नव्या चक्रीवादळाची निर्मीती झाली आहे. पण या वादळाचा तडाखा नेमका कोणत्या राज्यांना बसणार आहे? जाणून घेण्यासाठी वाचा...

Cyclone Sitrang : बंगालच्या उपसागरात सितरंग चक्रीवादळ पण धोका नेमका कुणाला?
X

देशातून मान्सून(Monsoon) ने माघार घेतली असली तरी बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) निर्माण झालेल्या चक्रीवादळाची मोठी धास्ती निर्माण झाली आहे.

बंगालच्या उपसागरात 23 ऑक्टोबरला चक्रीवादळाची निर्मीती (Cyclone) व्हायला सुरुवात झाली. त्यानंतर सोमवारी सहा तासात सितरंग (Sitrang Cyclone) हे चक्रीवादळ 15 किलोमीटर प्रति तास वेगाने ईशान्य दिशेला सरकरण्यास सुरुवात झाली. या चक्रीवादळाचे काही तासात तीव्र चक्रीवादळात रुपांतर होईल. त्यानंतर 25 ऑक्टोबर रोजी पहाटे सितरंग चक्रीवादळ बांग्लादेशातील टिंकोना (Tinkona) आणि सँडवीप (Sandvip Island) बेटाला धडकणार आहे.

या चक्रीवादळामुळे ईशान्य भारतातील आसाम (Assam), त्रिपुरा (Tripura), नागालँड(Nagaland), मणिपुर (Manipur), मेघालय(Meghalay), मिझोराम (Mizoram) आणि अरुणाचल प्रदेश (Arunachal pradesh) या राज्यांना भारतीय हवामान विभागाने (IMD) रेड अलर्ट (Red Alert) जारी केला आहे. त्यामुळे या भागात 25 ऑक्टोबर आणि 26 ऑक्टोबर रोजी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यापार्श्वभुमीवर त्रिपुरा सरकारने 26 ऑक्टोबर रोजी राज्यातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

सितरंग हे चक्रीवादळ सध्या सागर बेटापासून 380 किलोमीटर तर बारिसालपासून 520 किलोमीटर समुद्रात घोंघावत आहे. त्यातच हे चक्रीवादळ 25 ऑक्टोबर रोजी पहाटे किणारपट्टीला धडकणार असल्याने हवामान विभागाने सतर्कतेचे आवाहन केले आहे. त्यापार्श्वभुमीवर NDRF आणि SDRF ची पथके सतर्क ठेवण्यात आले आहेत.

सितरंग चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालमधील मिदनापुरसह किणारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच या चक्रीवादळामुळे 90 ते 100 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहू शकतात तर काही वेळा वाऱ्यांचा वेग 110 किलोमीटर प्रति तास पर्यंतही जाऊ शकतो, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.

Updated : 25 Oct 2022 1:03 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top