Aurangabad: आजपासून सिध्दार्थ उद्यान पुन्हा उघडणार; मात्र प्रवेशासाठी.....
X
औरंगाबाद महानगरपालिकेचे सिध्दार्थ उद्यान व प्राणीसंग्रहालय हे गेल्या दीड वर्षांपेक्षा अधिक काळ कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्रेक्षकांसाठी बंद करण्यात आले होते.मात्र आता सिध्दार्थ उद्यान आजपासून पर्यटकांसाठी पुन्हा सुरू करण्यात येत आहे.औरंगाबाद महानगरपालिकाने याबाबत माहिती दिली आहे.
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव हा कमी झाला असल्यामुळे कोरोनाच्या नियमांचे पालन करून शुक्रवारपासुन ( 12 नोव्हेंबर ) सिध्दार्थ उद्यान व प्राणीसंग्रहालय हे प्रेक्षकांकरीता उघडण्यात येत आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सिध्दार्थ उद्यान पाहण्याची इच्छा असलेल्या पर्यटकांना आता उद्यान पाहता येणार आहे.
सिध्दार्थ उद्यानाची वेळ सकाळी 8 वाजेपासून ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत व प्राणीसंग्रहालयाची वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत राहणार आहे. मात्र कोरोनाच्या दोन्ही लस घेतल्याचे प्रमाणपत्र असल्याशिवाय सिध्दार्थ उद्यान व प्राणीसंग्रहालयामध्ये प्रवेश मिळणार नाही. तसेच विना मास्क कोणलाही प्रवेश देण्यात येणार नसल्याचं महानगरपालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.