Home > News Update > भारताला काही आठवडे लॉकडाऊनची गरज, जो बायडन यांच्या वैद्यकीय सल्लागाराचा भारताला सल्ला

भारताला काही आठवडे लॉकडाऊनची गरज, जो बायडन यांच्या वैद्यकीय सल्लागाराचा भारताला सल्ला

भारताला काही आठवडे लॉकडाऊनची गरज, जो बायडन यांच्या वैद्यकीय सल्लागाराचा भारताला सल्ला
X

अमेरिकेतील प्रसिद्ध डॉक्टर आणि जो बायडन यांचे वैद्यकीय सल्लागार एंथनी फाउची (Anthony Fauci) यांनी भारतातील कोरोना व्हायरस (Coronavirus) संक्रमण थांबवण्यासाठी तात्काळ लॉकडाऊन लावण्याचा सल्ला दिला आहे.

फाउची यांनी 'इंडियन एक्सप्रेस' ला दिलेल्या मुलाखतीत ऑक्सिजन, औषधं आणि पीपीई कीट ची संख्या वाढवणं ही वेगळी बाब आहे. या संकटाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक गट स्थापन करायला हवा. जो गट बैठका आणि आवश्यक बाबींवर भर देईल.

यावेळी फाउची ने मोदींचं नाव न घेता 'जिंकण्याची घोषणा अगोदरच करण्यात आली' असं म्हणत मोदींना टोला लगावला. ते म्हणाले ' मला असं वाटतं की एक बाब फार महत्त्वाची आहे. ती म्हणजे ऑक्सिजन आणि पीपीई किटसहित औषधं असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर देशात लॉकडाऊन लावणं गरजेचं आहे.

लॉकडाऊन

फाउची यांनी सांगितलं की चीन मध्ये अशाच प्रकारे कोरोनाचं संक्रमण झालं होतं. तेव्हा त्यांनी पूर्णपणे लॉकडाऊन लावलं होतं. मी 6 महिने लॉकडाऊन लावा असं सांगत नाही. मात्र, कोरोनाची साखळी तुटेपर्यंत लॉकडाऊन लावावा. असं मी सांगत आहे. काही दिवस लॉकडाऊन लावलं तर संक्रमणाची साखळी थांबवण्यात मदत होते.

लसीकरण

यावेळी त्यांनी देशाने लसीकरणावर भर देणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त केलं. कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी लसीकरण महत्त्वाचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. 140 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात जर 2 टक्केचं लसीकरण झालं असेल तर लढाई खूप मोठी आहे. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तुम्हाला ही लसींचा तुटवडा भरुन काढावा लागणार आहे. तुम्हाला विविध देशांशी करार करावे लागतील. आता अनेक कंपन्यांकडे लसी आहेत. भारत जगातील सर्वांधिक लस तयार करणारा देश आहे. त्यामुळं भारताने आपली क्षमता वाढवायला हवी. असं मत फाउची यांनी व्यक्त केलं आहे.

Updated : 1 May 2021 4:00 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top