श्रीकृष्ण जन्मोत्सव बीडमध्ये उत्साहात साजरा
X
बीड : श्रीकृष्ण जन्मोत्सवाचं औचित्य साधत, बीडमध्ये एका भाविकाने 56 पदार्थांचा नैवैद्य अर्पण करत श्रीकृष्ण जन्मोत्सव एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला आहे.
बीड शहरातील शर्मा कुटुंबीयांनी ही आरास करण्यासाठी तीन दिवसांपासून तयारी केली. मागील नऊ वर्षांपासून हा श्रीकृष्ण जन्मोत्सव शर्मा कुटुंब साजरा करत आहेत, राजस्थानी ब्राह्मण समाजामध्ये गौरी गणपतीचा उत्सव साजरा केला जात नसल्याने, या दिवसाचे औचित्य साधत रात्री 12 वाजता कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्तानं 56 पदार्थांची आरास नैवेद्य म्हणून ठेवला जातो.
या पदार्थांमध्ये दूध, दही, लोणी, मिठाई यासह विविध 56 पदार्थ नैवद्यसाठी ठेवण्यात आलेत. तर रात्री बारा वाजता कृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला. ही 56 पदार्थांच्या नैवेद्याची आरास चांगलीच लक्षवेधी ठरते आहे.
यावेळी बोलताना पूनम शर्मा यांनी म्हटले आहे की, श्रीकृष्ण म्हटलं की, दूध आणि दही याचं महत्व सर्वश्रुत आहे त्यामुळे दूध आणि दही यापासून बनवलेले अधिक पदार्थ नेवैद्य म्हणून ठेवण्यात आले आहेत. यासाठी आम्ही सर्व पदार्थ हे घरगुती बनवले असल्याचे त्यांनी सांगितले सोबतच सजावटीसाठी आणखी एक जाईल असंही त्या म्हणाल्या. या उत्सवानिमित्त जगावर आलेलं कोरोना संकट आणि इतरही संकटं दूर होवो अशी प्रार्थना केल्याचे किशोर शर्मा यांनी सांगितले.