कोणत्याही परिस्थितीत आक्रमक खेळणार : श्रेयस अय्यर
इंग्लंडची आता खैर नाही,इंग्लंड दौऱ्या आधीच श्रेयस ने आक्रमक खेळण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. परिस्थिती कोणतीही असो आक्रमक खेळ खेळणार असल्याच मोठ विधान मधल्या फळीत खेळणारा भारताचा आक्रमक फलंदाज श्रेयस अय्यरने केल आहे.
X
इंग्लंडची आता खैर नाही,इंग्लंड दौऱ्या आधीच श्रेयस ने आक्रमक खेळण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. परिस्थिती कोणतीही असो आक्रमक खेळ खेळणार असल्याच मोठ विधान मधल्या फळीत खेळणारा भारताचा आक्रमक फलंदाज श्रेयस अय्यरने केल आहे.
आंध्राच्या वेगवान गोलंदाजांना अय्यरने जोरदार फटकेबाजी केली
परिस्थिती कोणतीही असो आक्रमक खेळ खेळणार असल्याचा निर्धार भारतीय फलंदाज श्रेयस अय्यर shreyas iyer केला आहे. पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या इंग्लंड विरोधारतल्या पाच सामन्याच्या कसोटी मालिकेसाठी तयारीसाठी भारतीय फलंदाज तब्बल पाच वर्षानंतर रणजी करंडक स्पर्धेत खेळण्यासाठी परतला आहे. यात पहिल्याच दिवशी अय्यरने यश मिळवले असून आंध्राच्या वेगवान गोलंदाजाना झोडत ४८ धावांची आक्रमक खेळी केली आहे. ज्यामुळे मुंबई हा सामना १० विकेट्स ने जिंकला आहे.

परिस्थिती कशी ही असली तरी मी आक्रमक खेळणार
"कोणत्याही परिस्थिति मध्ये आक्रमक खेळणार. ते स्वताच्या बचावासाठी गोलंदाजी करत होते. त्यांनी मला ताकदीनुसार खेळू दिले नाही. ते आखूड चेंडूचा मारा करत होते, तरी मी चौकार मारत धावा काढत होतो. ते नकारात्मक चेंडूचा मारा करत होते म्हणून चेंडू सोडल्याशिवाय मी काही करू शकत नव्हतो, माहीत होत की चेंडू सोडत राहिल्याने मला कंटाळा येईल पण मी त्या एवजी मी जाऊन काही स्ट्रोक खेळू इच्छितो त्यावेळी मी यायचा विचार केला" मुंबईच्या विजयानंतर श्रेयस अय्यरने हे मोठ विधान केल आहे.

श्रेयस अय्यरचा स्ट्राईक रेट वन डे मध्ये 101.27 एवढा असून ट्वेंटी-20 मध्ये 136.12 एवढा आहे. या स्ट्राईककडे पाहता असे लक्षात येते की श्रेयसला मुळातच आक्रमक खेळ करायला अवडतो. प्रथम श्रेणी क्रिकेट मध्ये त्याने हाच पावित्रा वापरला आहे. इंग्लंड विरोधात होणाऱ्या कसोटी मालिकेत अय्यर महत्वाची भूमिका बजावू शकतो. न्यूझीलंड विरोधात कसोटी मालिकेत पदार्पण करून 1 शतक व 1 अर्धशतक केले आहे. अय्यर ने आतापर्यंत कसोटीचे 12 सामने खेळळे आहेत.