लसीचा तुटवडा आहे मग काय फासावर लटकू का ? केंद्रीय मंत्र्यांचा संताप अनावर
X
देशात लसीकरणाचा बट्ट्याबोळ झाला असताना केंद्र सरकार अजूनही ठोस नियोजन करू शकलेले नाही, त्यातच देशातील लसींचा तुटवड्याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नावर केंद्रीय रसायने आणि खते मंत्री डीव्ही सदानंद गौडा चांगलेच भडकले. "देशात लसींचा तुटवडा आहे तर मग आम्ही फासावर लटकावे का?" असं उत्तर त्यांनी पत्रकारांना दिलं. तर दुसरीकडे भाजपचे सरचिटणीस सीटी रवी यांनी ही वादग्रस्त वक्तव्य करत म, " देशात जर व्यवस्था व्यवस्थीत नसती तर दहा पट मृत्यू झाले असते"
गौडा म्हणाले, "कोर्टानं चांगल्या अर्थानं म्हटलं आहे की देशात सर्वांना लस द्या. पण मला तुम्हाला विचारायचं आहे की, जर कोर्टानं उद्या म्हटलं की तुम्हाला इतक्याच लस द्यायच्या आहेत आणि तितक्या लस जर तयारच झाल्या नसतील तर आम्ही स्वतःला फाशी लावून घ्यावी का?" लसीच्या तुटवड्याच्या प्रश्नांवर केंद्रीय मंत्र्यांनी सरकारच्या योजनांबाबत माहिती देण्यावर जोर दिला आणि म्हटलं की, "सरकारी निर्णय कोणत्याही लाभ किंवा इतर कोणत्याही कारणांनी ठरलेले नसतात."
केंद्र सरकार आपलं काम प्रामाणिकपणे आणि निष्ठेनं करत आलं आहे मात्र हे करत असताना काही तृटीही समोर आल्या आहेत. व्यावहारिकदृष्ट्या काही गोष्टी आमच्या नियंत्रणाबाहेर आहेत, मग अशा गोष्टींचं सरकार व्यवस्थापन करु शकतं का? असा सवालही गौडा यांनी पत्रकारांना विचारला. यावेळी सीटी रवी म्हणाले, "जर व्यवस्था वेळेवर झाली नसती तर खूपच वाईट गोष्टी घडू शकल्या असत्या. मृत्यू १० पट किंवा १०० पट जास्त वाढले असते. कोरोना विषाणूच्या कल्पनेबाहेरील संक्रमणामुळे आमची तयारी अपयशी ठरली."
कोर्टांनी कोरोनाच्या स्थितीवरुन सरकारवर ओढलेल्या ताशेऱ्यांबाबत बोलताना रवी म्हणाले, "न्यायाधीशांना सर्वकाही माहिती नसतं. आमच्याजवळ जे काही उपलब्ध आहे, त्याच्या आधारे तांत्रिक सल्लागार समिती शिफारस करते की किती लसींचं वितरण केलं गेलं पाहिजे. त्यांच्या अहवालाच्या आधारेच आम्ही निर्णय घेत असतो.
एकंदरीत करून संसर्ग आणि मृत्यूमुळे आता आंतरराष्ट्रीय माध्यमांत बरोबरच देशी माध्यमातील सरकारवर टीका करू लागले आहेत आणि सरकार समर्थक दर्जी ने आता खुलेपणाने सरकारी धोरणावर टीका करू लागले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ते पश्चिम बंगाल निवडणूक निकालानंतर गायब झाल्याचे सांगितले जात असताना आता मंत्र्यांवर प्रश्नांचा मारा झाल्यानंतर अशी हतबलता येत असल्याचे दिसून येत आहे.