धक्कादायक ! चोरट्यांनी केंद्रीय मंत्र्यांच्या आईचं मंगळसूत्रचं पळवलं
X
गेल्या काही महिन्यापासून नाशिक मध्ये गुन्हेगारीचा सुळसुळाट वाढला आहे. नाशिकमध्ये गेल्या सात महिन्यांत 29 खुनाच्या घटना घडल्या आहेत. तेथील नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले. केंद्रीय मंत्र्यांच्या आईच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्यांना लांबवल्याने पुन्हा एकादा सुरक्षेचा मुद्दा समोर आला आहे.
नाशिकमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढल्याने सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री (MP Bharti Pawar) यांच्या आईच्या गळ्यातील सोन्याच्या मंगळसूत्राची चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भररस्त्यात चेन स्नॅचिंगचा हा खळबळजनक प्रकार घडल्याची माहिती समेर आली आहे. त्यामुळे नाशिकमध्ये सर्वसामान्यांसह नेतेमंडळीही असुरक्षित असल्याचे पाहायला मिळत आहेत.
नाशिक शहरात सर्वसामान्य नागरिक असुरक्षित असताना आता आमदार खासदार आणि मंत्र्यांचे कुटुंबीय ही असुरक्षित झाली आहेत. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्या आईच्या गळ्यातून मंगळसूत्र पळवल्याची घटना घडली आहे. भारती पवार यांच्या आई शांताबाई बागुल या आरटीओ परिसरातील बाजारामध्ये भाजी घेण्यासाठी गेल्या होत्या. दरम्यान दुचाकीस्वारांनी मंगळसूत्र पळवले असल्याचं तक्रार म्हसरूळ पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुठलेही हेल्मेट न घालता दुचाकीस्वारांनी राजरोसपणे चेनस्नॅचिंग केल्यामुळे नाशिक शहरातील गुन्हेगारीने कळस गाठल्याच समोर येत आहे.