फेसबुकने राजकीय धंदा बंद करावा, सामनामधून सल्ला
X
फेसबुकसारख्या (facebook) माध्यमांवर वाद-प्रतिवाद व्हायला हरकत नाही, पण द्वेष पसरवून देश व समाज तोडणारी भाषा वापरली गेली असेल तर त्यावर पक्षाचा विचार न करता कारवाई व्हायला हवी. द्वेष पसरवणारी व्यक्ती सत्ताधारी पक्षाची आहे म्हणून फेसबुकसारख्या कंपन्यांना डोळेझाक करता येणार नाही. तुम्ही आमच्या देशात धंदा करायला आलाय. तेव्हा उद्योग-व्यवसायातले किमान नीती-नियम पाळावेच लागतील. धंदा कमी होईल म्हणून दळभद्री विचार व लढायांचे व्यासपीठ म्हणून फेसबुकसारख्या माध्यमांचा वापर सुरू असेल तर त्याकडे काणाडोळा करता येणार नाही!
2014 ची लोकसभा निवडणूक भाजपने (BJP) मोदी (narendra modi )यांच्या नेतृत्वाखाली जिंकली. त्यात भाजपच्या समाज माध्यमांवर काम करणाऱ्या पगारी फौजांचे योगदान मोठे होते. तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग (dr manmohan singh) तसेच राहुल गांधी (rahul gandhi) यांना या गोबेल्स टोळीने साफ निकम्मे ठरवले. मनमोहन हे ‘मौनीबाबा’ तर राहुल गांधी यांना ‘पप्पू’ ठरवण्यात आले. त्याच वेळी मोदी हे सुपरमॅन, एकमेव तारणहार, विष्णूचे तेरावे अवतार असल्याचे शिक्कामोर्तब समाज माध्यमांनी करून टाकले.
हे ही वाचा...
पुण्यात एका दिवसात सर्वाधिक रुग्णांची नोंद
#BanonFacebook: फेसबूक वर बंदी घालावी का? : मुग्धा कर्णिक
फेसबुकच्या पक्षपाती धोरणाचा हा घ्या पुरावा !
BanonFacebook: मुस्लीम द्वेष कोणाच्या फायद्याचा… संजय सोनवणी
गेल्या सात वर्षांत खोटय़ाचे खरे व खऱ्याचे खोटे करण्याचे प्रकार समाज माध्यमांतून उघडपणे झाले. अफवा तसेच जातीय-धार्मिक द्वेष पसरवून राजकीय लाभ उठवले गेले. ‘‘हिंदुस्थानात फेसबुक व व्हॉट्सऍप (facebook and whatsapp) भाजप व संघाच्या नियंत्रणाखाली असून त्यांनी या माध्यमांतून खोट्या बातम्या आणि द्वेष पसरवला आहे. मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी याचा उपयोग केला आहे, पण आता अमेरिकन माध्यमाने फेसबुकविषयीचे सत्य उघड केले,’’ असे मत राहुल गांधी यांनी समाज माध्यमावरच व्यक्त केले.
भाजपच्या काही नेत्यांनी द्वेष पसरवणारा मजकूर फेसबुकवर टाकला व त्यावर फेसबुकने कारवाई करू नये यासाठी दबाब आणला, हे ‘फेसबुक’ कंपनीनेच मान्य केले आहे. या माध्यमांमुळे अनेकांच्या प्रतिभेस बहर आला, व्यासपीठ मिळाले हे खरे. त्यामुळे जगही जवळ आले, पण समाजात दरी निर्माण झाली हेसुद्धा तितकेच खरे. सोशल माध्यमांवर एखाद्याची यथेच्छ बदनामी करणे हा आता ‘पगारी’ व्यवसाय झाला आहे व त्यातून कोणीही सुटलेले नाही.
कालपर्यंत मनमोहन सिंग यांना दूषणे देणारे आज त्याच माध्यमांचा वापर करून पंतप्रधान मोदी, देवेंद्र फडणवीसांची (devendra fadnavis) खिल्ली उडवतात याचे वाईट वाटते. तुम्ही आमच्या देशात धंदा करायला आलाय. तेव्हा उद्योग-व्यवसायातले किमान नीती-नियम पाळावेच लागतील. धंदा कमी होईल म्हणून दळभद्री विचार व लढायांचे व्यासपीठ म्हणून फेसबुकसारख्या माध्यमांचा वापर सुरू असेल तर त्याकडे काणाडोळा करता येणार नाही