Home > News Update > लोकसभा अध्यक्षांना शिवसेनेचे आव्हान, सर्वोच्च न्यायालयात याचिका

लोकसभा अध्यक्षांना शिवसेनेचे आव्हान, सर्वोच्च न्यायालयात याचिका

लोकसभा अध्यक्षांना शिवसेनेचे आव्हान, सर्वोच्च न्यायालयात याचिका
X

एकनाथ शिंदे गट आणि शिवसेनेतील संघर्ष आता आणखीच चिघळला आहे. सोळा आमदारांवरील कारवाईचा मुद्दा सुप्रीम कोर्टात पोहोचला असताना आता शिवसेनेने लोकसभा अध्यक्षांना देखील सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दिलेल्या निर्णयाविरोधात शिवसेना सर्वोच्च न्यायालयातजाणार आहे.

शिवसेना संसदीय पक्षाच्या नेतेपदी विनायक राऊत यांच्या ऐवजी राहुल शेवाळेंच्या नियुक्तीला मान्यता देण्याच्या निर्णय लोकसभा अध्यक्ष मंदिरला यांनी दिला हो. त्यांच्या या निर्णयाविरोधात निर्णयाविरोधात शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे

एकीकडे सर्वोच्च न्यायालयामध्ये विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी दिलेल्या निर्णयाविरोधात खटला सुरू आहे. आता लोकसभा अध्यक्षांविरोधातही याचिका दाखल झाल्याने न्यायपालिका विरुद्ध कायदेमंडळ असा हा संघर्ष निर्माण झाला आहे.

सुप्रीम कोर्टात झालेल्या या आधीच्या सुनावणीमध्ये या राजकीय संघर्षात घटनात्मक पेच निर्माण झाल्याचं मत सुप्रीम कोर्टाने नोंदवलं होतं, तसेच हा खटला व्यापक घटना पीठाकडे देण्याचं मत सरन्यायाधीश रमण्णा यांनी व्यक्त केला होते. त्यामुळे आता या सर्व याचिकांवर सुप्रीम कोर्ट घटनापिठाकडे हे प्रकरण वर्ग करण्याचा निर्णय देते का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Updated : 28 July 2022 9:27 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top