राज्यातील पहिली तृतीयपंथी शिवानी सुरकार बनली वकील...
X
देशात तृतीयपंथी आता उच्च शिक्षण घेण्यासाठी पुढे सरसावले आहेत. विविध क्षेत्रातील शिक्षण घेवून तृतीयपंथी मोठ्या पदावर विराजमान होत आहेत. वर्धा जिल्ह्यातील शिवानी सुरकार या तृतीयपंथीने आपले वकीलीची शिक्षण पूर्ण करुन वकीली क्षेत्रात पदार्पण केले.
वर्धा जिल्ह्यातील तृतीयपंथी असलेल्या शिवानी सुरकार यांनी आज न्यायमंदिर येथे वकील म्हणून पहिल्या दिवशी काम सुरु केले. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या वकीलांनी आणि वकील संघाने शिवानी उर्फ विजयला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. पहिली तृतीय पंथी म्हणून तिने आजपासून न्यायामंदिरात कामाला सुरुवात केली.
आज वकील म्हणून काम करताना सर्वात आधी मी माझ्या वडिलांचे आभार मानते. त्यांनी मला शिकवलं, असे मत विजय उर्फ शिवानी सुरकार यांनी व्यक्त केले. पण आज मी वकील म्हणून काम करत असताना माझा आधार आणि मला शिकवणारे माझे बाबा माझ्यासोबत नाहीत, अशी खंत शिवानी यांनी बोलून दाखवली. पण वकील म्हणून काम करत असताना मला आनंद होत असल्याचे शिवानी यांनी सांगितले. तसेच मी गोरगरीब आणि तृतीयपंथी यांच्या ज्या काही समस्या असतील, त्या सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे शिवानी यावेळी म्हणाल्या. यावेळी मोठ्या संख्येने त्यांचे मित्र, मैत्रिणी, वकील आणि वकील संघाचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी शिवानी सुरकार यांचे अभिनंदन केले. बनली