सोमय्यांच्या ट्वीटनंतर शिवसेनेचे टेन्शन वाढले
गेल्या काही दिवसात राज्यात किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे आरोप करून राळ उडवून दिली आहे. त्यातच मंत्री नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ पुढचा नंबर अनिल परब यांचा असल्याचे ट्वीट किरीट सोमय्या यांनी केल्याने चर्चेला उधाण आले आहे.
X

राज्यात भाजप विरुध्द महाविकास आघाडी सरकार संघर्ष रंगला आहे. तर 100 कोटींच्या वसूलीच्या आरोपा प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख अटकेत आहेत. तर त्यापाठोपाठ अल्संख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांना अटक करण्यात आली. त्यामुळे भाजपकडून विरोधकांना नामोहरम करण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर केला जात असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. मात्र किरीट सोमय्या यांनी आता अनिल परब यांचा नंबर असे ट्वीट केले आहे, त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.
राज्यात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभुमीवर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, आत्ता अनिल परब चा ही नंबर लागणार. अनधिकृत, बेनामी, रिसॉर्ट आणि रिसॉर्टच्या बांधकामासाठी आलेला पैसा, त्याची चौकशी होणार. कारण भारत सरकारने दापोली येथील पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तर या प्रकरणाची 30 मार्च रोजी सुनावणी होणार आहे, असे ट्वीट करत मंत्री अनिल परब यांना इशारा दिला आहे.
किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांच्या दापोली येथील समुद्रकिणारी असलेल्या रिसॉर्टप्रकरणी अनिल परब यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. तर सोमय्यांच्या तक्रारीवरून अनिल परब यांच्यावर कारवाई होणार असल्याचा इशारा सोमय्या यांनी दिला आहे.