Home > News Update > 'उत्तर प्रदेशमध्ये शिवसेना जवळपास 100 जागा लढवणार'- राऊत

'उत्तर प्रदेशमध्ये शिवसेना जवळपास 100 जागा लढवणार'- राऊत

उत्तर प्रदेशमध्ये शिवसेना जवळपास 100 जागा लढवणार- राऊत
X

उत्तर प्रदेशमध्ये शिवसेना 100 जागांवर लढविण्याचा विचार करत असून , याबाबत पक्षांमध्ये चर्चा सुरू असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. गोव्यामध्ये साधारणतः 20 जागा लढविण्याचा आमचा विचार आहे. उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक लढवण्याची कार्यकारणीनी तयारी केली आहे. त्यादृष्टीने चर्चा सुरू असल्याचे राऊत म्हणाले.

दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर भाष्य करताना त्यांनी असा हवेत गोळीबार करू नये आणि कोणी कोणाच्या थोबाडीत वगैरे मारत नाहीत चंद्रकांत दादा पाटील असतील किंवा भारतीय जनता पार्टीचे आणखी कोणी लोक असतील ते अशा प्रकारच्या अफवा पसरवत असतात तर त्यानी तो आनंद घ्यावा पण वारंवार हेच सांगतो की हे सरकार पुढील तीन वर्ष उत्तम प्रकारे चालेल आणि त्यानंतर देखील महाविकास आघाडी सत्तेवर येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

गुजरातच्या मुख्यमंत्री बदलाबाबत बोलताना एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री बदलणे हा त्या राज्यात सत्तेत असणाऱ्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे. गुजरात राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाची स्थिती तितकीशी बरी नाही असं राऊत म्हणाले.

उत्तर प्रदेशमध्ये काही शेतकरी संघटना आहेत या संघटनांनी सांगितलेलं आहे की तुम्ही निवडणूक लढा आमचा तुम्हाला पाठिंबा आहे इतर काही लहान पक्ष आहेत त्यांना देखील शिवसेनेला पाठिंबा द्यायचा आहे गोव्यामध्ये देखील महाविकास आघाडी सारखा प्रयोग करण्याचा विचार आहे, त्याला कितपत यश येते त्यासंदर्भात निश्चित काही सांगता येणार नाही पण त्या संदर्भात हालचाली सुरू आहेत. महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेला चांगले स्थान मिळालं तर नक्कीच शिवसेना त्याच्या मध्ये सहभागी होऊ शकेल असं देखील राऊत म्हणाले.

Updated : 12 Sept 2021 10:55 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top