भाजपशी पुन्हा एकदा संपर्क करणार का? काय म्हणाले उद्धव ठाकरे
Max Maharashtra | 12 Nov 2019 11:28 PM IST
X
X
राज्यात निर्माण झालेल्या सत्ता स्थापनेच्या पेच प्रसंगा संदर्भात आज कॉंग्रेसचे दिल्लीचे नेते आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस चे अध्यक्ष शरद पवार यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडल्यानंतर आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली.
महाराष्ट्र सारख्या राज्यात सरकार स्थापन करताना काँग्रेस-राष्ट्रवादीला स्पष्टता हवी होती. तशीच शिवसेनेलाही हवी होती. राज्याला स्थिर सरकार देण्यासाठी वेळ हवी होती. त्यासाठी वेळ वाढवून मागितला, पण राज्यपाल म्हणाले 48 तास नाही तर 6 महिने देतो, त्यांचं गणित मला अजून समजलेलं नाही असं म्हणत राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
आमचा मित्र पक्ष आमच्या पेक्षा कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या संपर्कात जास्त होता. असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं. यावर उद्धव यांनी फडणवीस यांना टोला लगावला. आज आघाडीच्या झालेल्या पत्रकार परिषदेत काल आम्ही पहिल्यांदाच काँग्रेस आणि राष्ट्रवादीला संपर्क साधला असं कॉंग्रेस नेते अहमत पटेल यांनी स्पष्ट केलं. त्यानंतर उद्धव यांनी आमचा मित्रपक्ष आम्ही भाजपपेक्षा आघाडीशी संपर्कात आहे असं म्हणत होता, त्यांना हे उत्तर होतं. असं म्हणत टोला लगावला आहे.
राज्यात लागू झालेल्या राष्ट्रपती राजवटीला घाबरण्याचं कारण नाही, राष्ट्रपती राजवट लागली असली तरी आपण सत्ता स्थापनेचा दावा कधीही करु शकतो. राज्यपालांनी काल आम्हाला 7.30 पर्यंतची मुदत दिली. ती मुदत संपण्यापूर्वी म्हणजे भाजपला दिलेल्या वेळेतच आमच्या वेळेची मुदत देण्यात आली. त्या पत्रात आमदारांच्या पाठिंब्याच्या सह्या हव्या होत्या.
उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेचे मुद्दे
काल आम्ही माननीय राज्यपाल महोदयांना भेटून हीच विनंती केली होती की, आम्ही सरकार बनवू इच्छितो, तो दावा आमचा आजही कायम आहे.
काल पहिल्याप्रथम अधिकृतपणे शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सरकार स्थापनेसाठी पाठिंबा देण्यासंदर्भात संपर्क केला. मला असं वाटतं गेल्या अनेक वर्षांमध्ये एवढी दयावान व्यक्ती महाराष्ट्राला राज्यपाल म्हणून लाभली नसेल कारण त्यांना जेव्हा आम्ही सांगितले की, आम्हाला ४८ तास पाहिजेत, ते म्हणाले ४८ तास तुम्हाला देणार नाही, तुम्हाला मी ६ महिन्यांची मुदत देतो.
महाराष्ट्रासारख्या किंबहुना कोणत्याही राज्याचं सरकार स्थापन करणे आणि ते स्थिरपणे चालवणे हा पोरखेळ नाही आहे. त्याकरिता आम्हाला ४८ तासांची मुदत पाहिजे होती. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस आम्ही एकत्र बसू आणि मग Common Minimum Program त्यावरती विचार करून आम्ही सरकार बनविण्यासाठी आमचा दावा कायम आहे तो पुढे नेऊ.
मला अरविंद सावंत यांचे धन्यवाद द्यायचे आहेत. कारण अनेकांना मंत्रिपदाचा मोह असतो. पण हा शिवसेनाप्रमुखांचा कडवट शिवसैनिक ज्या मंत्रिमंडळात ते होते त्या पक्षाकडून आपल्या पक्षाला विचित्र वागणूक मिळते ती सहन न झाल्यामुळे त्यांनी राजीनामा दिलेला आहे.
अरविंद, तुमचा आम्हाला शिवसेनाप्रमुखांचा शिवसैनिक म्हणून अभिमान वाटतो, गर्व आहे. मी भाजपा आणि मुफ्ती मेहमुबा एकत्र कसे आले, ती विचारधारा कशी एकत्र आली. तो सुद्धा करार मागवलेला आहे. नितीश कुमार आणि भाजपा कसे एकत्र आले, रामविलास पासवान आणि भाजपा कसे एकत्र आले, मोदी हटाव म्हणणारे चंद्राबाबू आणि भाजपा कसे एकत्र आले होते.
या विचारधारा कोणत्या संगमावर एकत्र आल्या ही सगळी माहिती मी मागवली आहे. आणि ही माहिती एकत्र केल्यानंतर आम्ही भिन्न विचारधारेचे पक्ष एकत्र कसे येऊ हे आमचे आम्ही ठरवू.
Updated : 12 Nov 2019 11:28 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire