शिवसेना(शिंदे गटाचे)आमदार किशोर पाटील यांच्या समर्थकांकडून पत्रकाराला बेदम मारहाण
X
मुख्यमंत्र्यांविरुद्ध वक्तव्य केल्याच्या रागातून आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार संदीप महाजन यांना अश्लील शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप गेल्या आठवड्यात व्हायरल झाली होती. त्यानंतर पत्रकाराला मारहाण करणारा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे.
पाचोरा येथील पत्रकार संदीप महाजन यांनी भडगाव तालुक्यातील गोंडगावं येथील चिमुकलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणात मुख्यमंत्र्यांची चमकोगीरी असे वृत्त प्रसारित केल्याच्या रागातून पाचोरा भडगाव चे शिवसेना ( शिंदे गट ) आमदार किशोर पाटील यांनी पत्रकार संदीप महाजन यांना अश्लील शिवीगाळ केली होती तसंच मारहाण करण्याचीही धमकी दिली होती,त्या विषयाची ऑडियो क्लिप व आमदार किशोर पाटील यांनी दिलेली प्रतिक्रिया ही सर्वत्र प्रसारित झाली.त्या नंतर काल पत्रकार संदीप महाजन हे बातमी करून घरी जात असतांना आमदार किशोर पाटील यांच्या समर्थकांनी रस्त्यात अडवून बेदम मारहाण केली असा व्हिडीओ ही आता व्हायरल झाला आहे.
दरम्यान मारहाण करणारे आमदार यांचे समर्थक आहे असा आरोप पत्रकार महाजन यांनी केला आहे. आपल्या जीवाला काही बरे बाईट झाले तर आमदार किशोर पाटील आणि पोलीस प्रशासन जबाबदार असेल आपल्याला संरक्षण मिळावे अशी समाज माध्यमामध्ये प्रतिक्रिया दिली आहे तसंच तक्रारही पोलिसात दिली आहे.