Home > News Update > कंगणाच्या वक्तव्याचा शिवसेनेकडून निषेध ; देशाच्या स्वातंत्र्याबाबत केले होते वादग्रस्त वक्तव्य
कंगणाच्या वक्तव्याचा शिवसेनेकडून निषेध ; देशाच्या स्वातंत्र्याबाबत केले होते वादग्रस्त वक्तव्य
टीम मॅक्स महाराष्ट्र | 11 Nov 2021 8:36 PM IST
X
X
मुंबई : अभिनेत्री कंगना राणावत यांनी 1947 साली जे स्वातंत्र्य मिळाले ते स्वातंत्र्य नव्हते तर भीक होती , खर स्वातंत्र्य 2014 साली मिळालं असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.अभिनेत्री कंगना राणावतच्या या वक्तव्याचा सर्व स्तरातून निषेध नोंदविण्यात येत आहे. याबाबत आज शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी देखील अभिनेत्री कंगना राणावतच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला. खासदार शिंदे यांनी कंगना हिला असेच बेताल व्यक्तव्य करण्याची सवय आहे.तिच्या या वक्तव्याचा शिवसेनेतर्फे आम्ही निषेध व्यक्त करतो असं म्हटले आहे.
खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे डोंबिवली पश्चिम येथील शिवसेनेचे माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांच्या प्रभागातील रस्त्यांच्या उद्घाटनासाठी आले होते त्यावेळी त्यांनी अभिनेत्री कंगना राणावतच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला.
Updated : 11 Nov 2021 8:36 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Maharashtra. All Rights reserved.
Designed by Hocalwire