देवेंद्र फडणवीस शरद पवार भेटीवर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया
X
माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांची 31 मेला भेट घेतली. या भेटीवर शिवसेनेने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 'सामना'चे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत यांनी यावर आपली भूमिका मांडली आहे.
महाविकास आघाडीला कोणत्या प्रकारचं सहकार्य विरोधी पक्षाने करण्याची गरज आहे यासंबंधी शरद पवारांनी फडणवीसांना मार्गदर्शन केलं असेल. शरद पवारही विरोधी पक्षनेते होते. त्याकाळात विरोधी पक्ष नेते म्हणून राज्याच्या विधीमंडळात उत्तम काम केलं होतं. त्यामुळे फडणवीस त्यांच्याकडे गेले असतील तर त्यांना चांगलं मार्गदर्शन केलं असेल. राज्याला विरोधी पक्षांची मोठी परंपरा आहे. महाराष्ट्रात आपली परंपरा आहे. इतर राज्यांप्रमाणे राजकारणात आपण शत्रुत्व घेऊन बसत नाही. भेटीगाठी, चर्चा होत असते. त्यामुळे या भेटीकडे फार राजकीय हेतूनं पाहणं चुकीचं आहे.
अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी या भेटीवर दिली आहे.