...तर दिवेकरच तुम्हाला कचऱ्यात टाकतील; रमाकांत मढवी यांचा मनसे आमदारांना टोला
X
कल्याण : कल्याण ग्रामीण विधानसभेची निवडणूक तुम्ही कचऱ्याच्या मुद्द्यावर जिंकलात , त्यांना राजकारण करण्यासाठी कचराच लागतो ,कचऱ्यावर झोपडी बांधून त्यांनी आंदोलनाची नौटंकी केली आता तेच दिव्यातून डम्पिंग बंद करण्यास विरोध करत आहेत असा टोला शिवसेना नगरसेवक रमाकांत मढवी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील यांना लगावला आहे. तसेच ज्या कचऱ्याच्या मुद्दयांवर तुम्ही निवडणुका जिंकलात त्याच कचऱ्यात तुम्हाला दिवेकर टाकतील असा इशाराही मढवी यांनी दिला आहे.
गेली अनेक वर्षे दिव्यातील डम्पिंगचा मुद्दा निवडणुकीचा मुद्दा बनत आहे. याच डम्पिंगचा प्रश्न मार्गी लावण्यात आला असून त्यानुसार मौजे भंडार्ली येथील सुमारे ४ हेक्टर जागा ठाणे महापालिकेच्या प्रकल्पास घेतली आहे, तश्या पद्धतीचा ठराव देखील ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला आहे. मात्र मनसेचे स्थानिक आमदार राजू पाटील यांनी स्थारांतरील होणाऱ्या या प्रकल्पला तीव्र विरोध केला आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनचे नगरसेवक रमाकांत मढवी यांनी पाटील यांचा चांगलाच समाचार घेतला असून स्थानिक गावातील नागरिकांचे माथी भडकवण्याकचे काम राजू पाटील करत आहेत अशी टीका यावेळी मढवी यांनी केली.
प्रत्येक शहरात कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला असताना ठाण्यात देखील डम्पिंगचा प्रश्न गेली अनेक वर्षे रखडला होतो. याच पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेकडून हा कचरा शहराबाहेरील भंडार्ली गावातील ४ हेक्टर जमीनीवरील डंम्पिंग ग्राऊंडवर टाकण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.
ठाणे महापालिकेच्या सत्तेत असणाऱ्या शिवसेनेने देवेकरांना दिलेला शब्द पाळला असून दिवेकाराच्या मनात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मात्र मनसेच्या आमदारांना फक्त राजकारण करायचे असून त्यांना कचऱ्यावरती निवडणूक लढवायची असल्याने पाटील यांचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान कचऱ्यासंदर्भात संघर्ष करण्याची तयारी आमची असून शिवसेना देवेकरांसाठी सक्षम आहे.