शिवसंग्राम पक्ष लोकसभा निवडणुकीत तीन, विधानसभा निवडणुकीत बारा जागा लढवणार
शिवसंग्राम पक्ष येत्या लोकसभा निवडणुकीत तीन, तर विधानसभा निवडणुकीत बारा जागा लढविणार आहे. मात्र या जागा कोणत्या असतील यावर मात्र निर्णय झालेला नाही. शिवसंग्राम पक्ष हा महायुतीचा घटक पक्ष आहे.
X
पक्ष येत्या लोकसभा निवडणुकीत तीन, तर विधानसभा निवडणुकीत बारा जागा लढविणार आहे. मात्र या जागा कोणत्या असतील यावर मात्र निर्णय झालेला नाही. शिवसंग्राम पक्ष हा महायुतीचा घटक पक्ष आहे.
डॉ. ज्योती विनायक मेटे या बीड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार
शिवसंग्राम पक्षाच्या संघटन बांधणीसाठी पदाधिकाऱ्यांसाठी आज पुणे येथे राज्यस्तरीय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर संपल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत तानाजी शिंदे बोलत होते. शिवसंग्राम पक्षाच्या मागणीनुसार लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी जागा सोडण्याचा आग्रह महायुतीकडे धरण्यात येणार आहे.
या पक्षाच्या नेत्या डॉ. ज्योती विनायक मेटे या बीड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याचे शिवसंग्राम पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे यांनी माहिती दिली . शिंदे पुढे म्हणाले, "महायुतीमध्ये शिवसंग्राम पक्ष हा भारतीय जनता पक्षाचा घटक पक्ष आहे. गेल्या वेळी शिवसंग्राम पक्षाने लोकसभा निवडणूक लढवली नव्हती. मात्र या वेळेस 'शिवसंग्राम'ने लोकसभेच्या तीन जागांवर तयारी सुरू केलेली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसंग्राम पक्षाचे दोन आमदार निवडून आले होते.
शिवसंग्राम कधीही संपणार नाही. हा एक वटवृक्ष आहे
या वेळेला शिवसंग्राम पक्ष विधानसभेच्या बारा जागांसाठी आग्रही आहे. भारतीय जनता पक्षाकडून महायुतीमध्ये आम्हाला योग्य तो सन्मान मिळेल. तसेच लोकसभा व विधानसभा निवडणुकीत अपेक्षित जागा मिळतील, असा विश्वास आहे."'शिवसंग्राम' ही स्व. विनायक मेटे यांनी स्थापन केलेली संघटना आहे. त्यामुळे त्यांनी राज्यभर निर्माण केलेल्या मावळ्यांच्या जिवावर ही संघटना पुढे वाटचाल करणार आहे. शिवसंग्राम संपवण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. परंतु शिवसंग्राम कधीही संपणार नाही. हा एक वटवृक्ष आहे, ज्याच्या विचारांची मुळे जमिनीत घट्ट रोवलेली आहेत. येणाऱ्या काळात जरूर संघर्ष करावा लागेल.परंतु स्व. विनायक मेटे यांच्याकडून आम्ही संघर्ष शिकलेलो आहोत. यानुसार आजच्या बैठकीमध्ये पक्ष बांधणी अधिक मजबूत करण्याच्या बाबतीत अनेक निर्णय घेण्यात आले असल्याचे या पत्राच्या नेत्या डॉ. ज्योती मेटे यांनी सांगितले.