Home > News Update > शिंदे सरकारचा मोठा निर्णय: मुंबईतील 'या' टोलनाक्यांवर टोलमाफी

शिंदे सरकारचा मोठा निर्णय: मुंबईतील 'या' टोलनाक्यांवर टोलमाफी

शिंदे सरकारचा मोठा निर्णय: मुंबईतील या टोलनाक्यांवर टोलमाफी
X

मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. शिंदे सरकारने मुंबईतील पाच प्रमुख टोलनाक्यांवर हलक्या वाहनांना टोलमाफी देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आज रात्री बारा वाजल्यापासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकत्याच झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयाची घोषणा केली. मुंबईतील वाशी, दहिसर, ऐरोली, आनंदनगर आणि एलबीएस मुलूंड या टोलनाक्यांवर टोलमाफी लागू करण्यात येणार आहे.

मुंबईत एमएसआरडीसीने ५५ उड्डाणपुलांची उभारणी केली होती, ज्यांचा खर्च वसूल करण्यासाठी १९९९ मध्ये मुंबईच्या प्रवेशद्वारांवर टोलनाके उभारण्यात आले होते. २००२ मध्ये हे पाच टोलनाके सुरू करण्यात आले, आणि त्यानंतर २२ वर्षांपासून मुंबईमध्ये प्रवेश करताना टोल वसुली सुरू होती.

गेल्या काही वर्षांमध्ये मुंबईतील सर्व टोल माफ करण्यात यावेत, अशी मागणी राज ठाकरे यांच्या मनसे पक्षाकडून वारंवार केली जात होती. त्यांनी यासाठी अनेक आंदोलनं केली असून, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची देखील भेट घेतली होती.

या निर्णयामुळे मुंबईतील नागरिकांना मोठा फायदा होईल, आणि शहरात प्रवेश करताना आर्थिक भार कमी होईल. शिंदे सरकारच्या या निर्णयामुळे मुंबईकरांना एक नव्या आशेचा किरण मिळाला आहे, ज्यामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल घडण्याची शक्यता आहे.

Updated : 14 Oct 2024 12:42 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top